शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

मी संपलेली नाही, हे टीकाकारांना प्रत्युत्तर - द्युती चंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:37 IST

समलैंगिक संबंधांची कबुली दिल्याने संपविण्याचा झाला प्रयत्न

नवी दिल्ली : धावपटू द्युती चंद हिने समलैंगिक संबंधांचा खुलासा करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिच्याबद्दल नकारात्मक गोष्टी पसरविण्यात आल्या. करिअर संपल्याची अफवा पसरविण्यात आली. द्युतीने मात्र विश्व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकून टीकाकारांची बोलती बंद केली. ‘मी संपलेले नाही. तुमच्या टीकेनंतर माझ्यात यश मिळविण्याची लालसा निर्माण झाली,’ अशी प्रतिक्रिया द्युती चंदने दिली.२३ वर्षांच्या द्युतीने ९ जुलै रोजी नेपोली येथे विश्व विद्यापीठ स्पर्धेचे सुवर्ण जिंकले. समलैंगिक संबंधांची कबुली दिल्यानंतर तिच्यावर जी टीका झाली, त्या सर्व टीकाकारांना धारेवर धरताना आपण संपलो नाही, ही तर सुरुवात असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. या खेळात सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू बनली.वृत्तसंस्थेशी बोलताना द्युती म्हणाली,‘अनेकांनी माझ्याविरुद्ध अर्वाच्य शब्द वापरले. द्युतीने खासगी आयुष्यावर फोकस केले असून खेळाकडे तिचे लक्ष नसल्याची टीका झाली. अ‍ॅथलेटिक्समधील करिअर संपल्याची अफवा पसरविण्यात आली. मात्र मी संपलेले नाही. अन्य लोकांसारखी मी देखील खासगी आयुष्याबद्दल चिंतेत असते. याच कारणास्तव मी आपल्या संबंधांची कबुली दिली. याचा अर्थ असा नव्हे की खेळाकडे माझे लक्ष नाही. माझ्यादृष्टीने संबंधांची कबुली देणे आवश्यक होते. आता माझा फोकस आधीच्या तुलनेत करिअरकडे अधिक आहे.’ (वृत्तसंस्था)विश्व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकताच द्युतीने टिष्ट्वट केले होते की, ‘माझा अपमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मी आणखी वेगाने भरारी घेणार आहे.’ द्युतीला दोहा येथे या वर्षाअखेर होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायचा असून पुढील वर्षीच्या टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.मोठ्या स्पर्धांसाठी विनंती!द्युती म्हणाली, ‘विश्वस्तरावरील हे माझे पहिले सुवर्ण आहे. पुढचा रस्ता कठीण आहे. माझे लक्ष्य विश्व चॅम्पियनशिप व नंतर आॅलिम्पिक आहे. मला चाहत्यांचे मोठ्या संख्येने अभिनंदन संदेश येत असले तरी पाय जमिनीवर आहेत. आशिया किंवा युरोपमध्ये स्पर्धा खेळून पात्रता वेळ गाठायची इच्छा असल्याने भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडे मोठ्या स्पर्धांसाठी विनंती केली आहे.’

टॅग्स :Dutee Chandद्युती चंदIndiaभारत