प्रो कबड्डी : बंगळुरू बुल्सची तेलुगू टायटन्सला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:46 IST2019-08-08T21:45:45+5:302019-08-08T21:46:38+5:30

बुल्सने यावेळी टायटन्सचा 47-26 अशा फडशा पाडत मोठा विजय मिळवला.

Pro Kabaddi: Bengaluru Bulls beat Telugu Titans | प्रो कबड्डी : बंगळुरू बुल्सची तेलुगू टायटन्सला धडक

प्रो कबड्डी : बंगळुरू बुल्सची तेलुगू टायटन्सला धडक

नवी दिल्ली : बंगळुरू बुल्सने आजच्या पहिल्या सामन्यात तेलुगू टायटन्सला धडक दिल्याचे पाहायला मिळाले. बुल्सने यावेळी टायटन्सचा 47-26 अशा फडशा पाडत मोठा विजय मिळवला.

बुल्सकडून यावेळी खोलवर चढाया आणि जोरदार पकडी पाहायला मिळाल्या. या दोन्ही आघाड्यावर बुल्स टायटन्सपेक्षा वरचढ ठरले आणि विजय मिळवला. बुल्सने या सामन्यात 21 गुण चढाईंमध्ये मिळवले, तर पकडींमध्ये 19 गुणांची कमाई केली. दुसरीकडे टायटन्सला चढाईमध्ये 16 आणि पकडींमध्ये 10 गुण मिळवता आले.
 

Web Title: Pro Kabaddi: Bengaluru Bulls beat Telugu Titans