शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

महापौर मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी

By admin | Updated: October 24, 2015 02:50 IST

गेल्या काही वर्षांपासून आपल्या आयोजनाने क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधणाऱ्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनच्या तयारीसाठी वसई - विरार महानगरपालिकेची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून आपल्या आयोजनाने क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधणाऱ्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनच्या तयारीसाठी वसई - विरार महानगरपालिकेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आगामी २२ नोव्हेंबरला रंगणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून, या वेळी देशभरातील अव्वल धावपटूंनी स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केलेला असल्याने या मॅरेथॉनची उत्सुकता वाढली आहे. त्याचप्रमाणे यंदाची बक्षीस रक्कम २६ लाखांपर्यंत असून, विजेत्यांमध्ये विजेतेपद पटकावण्याची मोठी चुरस दिसेल असे आयोजकांकडून सांगितले जात आहे.‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा व निसर्ग समतोल पाळा’ असा संदेश देण्यात येणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह राज्यातून तसेच देशभरातून धावपटू सहभागी होणार असल्याने यंदा अधिक आव्हान असेल. वसई - विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला - क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मॅरेथॉनला २०१२ साली राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा मिळाला. यंदाच्या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा या वेळी घेण्यात येणार आहेत.पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्याला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक तर अर्ध मॅरेथॉनमधील विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे पारितोषिक पटकावण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे दोन्ही गटांतील पारितोषिकांमध्ये अनुक्रमे ५० व २५ हजार रुपयांची वाढ यंदा करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी या वेळी १८ वर्षांखालील मुले (११ किमी) आणि मुली (७ किमी) अशी विशेष स्पर्धा घेण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)महापौर मॅरेथॉनसाठी जय्यत तयारीमुंबई : गेल्या काही वर्षांपासून आपल्या आयोजनाने क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधणाऱ्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनच्या तयारीसाठी वसई - विरार महानगरपालिकेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आगामी २२ नोव्हेंबरला रंगणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून, या वेळी देशभरातील अव्वल धावपटूंनी स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केलेला असल्याने या मॅरेथॉनची उत्सुकता वाढली आहे. त्याचप्रमाणे यंदाची बक्षीस रक्कम २६ लाखांपर्यंत असून, विजेत्यांमध्ये विजेतेपद पटकावण्याची मोठी चुरस दिसेल असे आयोजकांकडून सांगितले जात आहे.‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा व निसर्ग समतोल पाळा’ असा संदेश देण्यात येणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह राज्यातून तसेच देशभरातून धावपटू सहभागी होणार असल्याने यंदा अधिक आव्हान असेल. वसई - विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला - क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मॅरेथॉनला २०१२ साली राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा मिळाला. यंदाच्या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा या वेळी घेण्यात येणार आहेत.पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्याला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक तर अर्ध मॅरेथॉनमधील विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे पारितोषिक पटकावण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे दोन्ही गटांतील पारितोषिकांमध्ये अनुक्रमे ५० व २५ हजार रुपयांची वाढ यंदा करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी या वेळी १८ वर्षांखालील मुले (११ किमी) आणि मुली (७ किमी) अशी विशेष स्पर्धा घेण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)पूर्ण मॅरेथॉन : निरज पाल, एलाम सिंग, नितेंदर संग रावत, प्रल्हाद सहाई मीना, गिरीश तिवारी, राधे कुमार, सुनील कुमार आणि कपिल कुमार.अर्ध मॅरेथॉन : (पुरुष) - व्ही.एल. डांगी, राहुल कुमार पाल, गौतम त्यागी, संजीथ लुवांग, गोविंद सिंग आणि हरी शंकर शर्मा.(महिला) - कविता राऊत, मोनिका आठारे, प्रियंका सिंग पटेल, मोनिका राऊत, रोहिणी राऊत, विजयमाला पाटील आणि मनीषा साळुंखे.पूर्ण मॅरेथॉन नवीन विवा कॉलेजपासून सकाळी ६ वाजता सुरू होऊन याच ठिकाणी संपेल. अर्धमॅरेथॉनला वसई तहसील येथून ६.४५ वाजता सुरुवातहोऊन नवीन विवा कॉलेजजवळ समाप्त होईल. तर यानंतर ११ किमीची शर्यत नवीन विवा कॉलेजपासून सुरू होऊन वसंतनगरी मैदानात समाप्त होईल.गेल्या चार वर्षांतील कसर या वेळी भरून काढण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्थानिक उद्योगाला चालना देण्यासाठी स्पॉन्सर्स म्हणून स्थानिक उद्योगांची निवड केली आहे; तसेच खास पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.- क्षितिज ठाकूर, आमदार