शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

एशियन स्पर्धेसाठी प्रणवची निवड, महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 04:18 IST

देशाचे प्रतिनिधित्व करणार

ठाणे : इंडोनेशिया येथे ८ ते १६ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ‘तिसऱ्या एशियन पॅरा गेम्स’ या स्पर्धेसाठी ठाण्यातील सतरावर्षीय प्रणव प्रशांत देसाई याची निवड झाली आहे. तो या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार असून त्याचबरोबर तो या अ‍ॅथलेटिक स्पर्धेत निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव अ‍ॅथलेटिकपटू असल्याची माहिती त्याचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. येत्या ३ आॅक्टोबर रोजी या स्पर्धेसाठी तो रवाना होत असून खुल्या गटातील १०० आणि २०० मीटर या दोन्ही स्पर्धांत तो धावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत साधारणत: चाळीसहून देशांतील चार हजारांहून अधिक विविध स्पर्धा प्रकारांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्यासाठी असलेल्या टॉप आठमध्ये तो पात्र ठरला. त्यामुळे त्याची इंडोनेशिया येथे होणाºया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड झालेला ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील तो पहिला अ‍ॅथलेटिकपटू आहे. तो या स्पर्धेत त्याच्यापेक्षा वयाने किमान चार ते पाच वर्षे मोठ्या असलेल्या खेळाडूंशी दोन हात करणार आहे. २०१७ साली झालेल्या दुबई येथील राष्ट्रीय स्पर्धेतही प्रणव याने रौप्यपदकाची कमाई केली होती. साधारणत: दोन ते तीन वर्षांपूर्वी त्याने ठाण्याच्या दादोजी कोंडदेव मैदानावर अ‍ॅथलेटिक्सचा सराव सुरू केला होता. त्याच्या मेहनतीमुळे त्याला हे शिखर गाठता आल्याचे पाटकर सांगतात.दररोज पाच तास सरावमुंबईतील वझे महाविद्यालयात इयत्ता बारावीचा विद्यार्थी असलेला प्रवण हा इंडोनेशिया स्पर्धेसाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी असा दिवसाला जवळपास पाच तास सराव करतो. गेले तीन आठवडे त्याने गांधीनगर येथे या स्पर्धेची संघासोबत कसून तयारी केली आहे. ३ आॅक्टोबर रोजी तो इंडोनेशिया येथे रवाना होईल.

टॅग्स :thaneठाणेAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा