शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

द्विपक्षीय मालिकेची शक्यता मावळली नाही

By admin | Updated: October 23, 2015 01:18 IST

आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या प्रस्तावित भारत - पाक द्विपक्षीय मालिकेच्या आशा अजूनही पूर्णपणे मावळल्या नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)

कराची : आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या प्रस्तावित भारत - पाक द्विपक्षीय मालिकेच्या आशा अजूनही पूर्णपणे मावळल्या नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आणि आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी मंडळाच्या निमंत्रणावरून मुंबई दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) अधिकाऱ्यांचा बीसीसीआयने योग्यप्रकारे पाहुणचार केला.सध्याची स्थिती भारत - पाक मालिका होणार नाही अशी असताना, शुक्ला यांनी केलेल्या विधानांमुळे पुन्हा एकदा या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेली दक्षिण आफ्रिकेविरुध्दची एकदिवसीय मालिका २५ आॅक्टोबरला समाप्त होणार असून, या मालिकेनंतर भारत-पाक मालिकेबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते, असे शुक्ला यांनी सांगितल्याने आणखीन उत्सुकता वाढली आहे.शुक्ला यांनी एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली की, अजूनही या प्रस्तावित मालिकेची शक्यता मावळली नसून, कधीही याबाबत चर्चा करू शकतो. त्याचवेळी पीसीबीचे कार्यकारी समिती प्रमुख नजम सेठी यांनी बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)