शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंना कोठेही खेळण्याचा अधिकार : साक्षी

By admin | Updated: October 8, 2016 03:43 IST

साक्षी मलिक हिने खेळाडूंना जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध खेळण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

बंगळुरू : राजकीय तणावादरम्यान भारतात पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास मान्यता देण्याविषयीच्या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती साक्षी मलिक हिने खेळाडूंना जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध खेळण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.पाकिस्तानी खेळडूंना विविध आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत खेळण्यास आमंत्रित करायला हवे, असे मी म्हटल्याचे आज सकाळी मीडियात दाखविले जात होते. तथापि, मी असे काहीही म्हटले नाही, असे साक्षीने सांगितले. उरी हल्ल्यानंतर भारतीय सरकारच्या लक्ष्यित हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर भारतात खेळण्याच्या बंदीविषयी विचारलेल्या प्रश्नावर साक्षीची प्रतिक्रिया मागण्यात आली होती.(वृत्तसंस्था)याविषयी साक्षीने स्पष्टीकरण देताना म्हटले, की तिने ‘खेळाडूंना जगात कोठेही खेळण्याचा अधिकार आहे,’ एवढेच म्हटले होते. ती म्हणाली, ‘‘मी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळण्यास मान्यता देण्याविषयी वकिली केली नव्हती. खेळाडूंना सर्वच अधिकार आहे. जसे की, आम्ही स्पर्धेत (आॅलिम्पिक) सहभागी होणे आणि आम्ही अन्य खेळाडूंविरुद्ध खेळतो, जे विविध देशांचे असतात.’’