शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महिला क्रिकेटपटूंना लीगसाठी परवानगी

By admin | Updated: June 3, 2016 02:24 IST

भारतीय महिला क्रिकेटपटूंना विदेशात लीग खेळण्यास बीसीसीआयने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटपटूंना विदेशात लीग खेळण्यास बीसीसीआयने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिताली राज, झुलन गोस्वामीसारख्या खेळाडूंचा ‘बिग बॅश’सारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने याआधी महिला क्रिकेटपटूंना केंद्रीय करारात सहभागी केले आहे. ईएसपीएन क्रिक इन्फोनुसार भारतीय महिला खेळाडू यापुढे इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात लीग खेळू शकतील. त्यांच्या कराराला बीसीसीआयने मान्यता दिल्यानंतर त्यांना विदेशात खेळण्यासाठी जाता येईल. बीसीसीआयच्या महिला क्रिकेट समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत महिला खेळाडूंना आॅस्ट्रेलिया, तसेच इंग्लंडमधील लीग खेळण्यास परवानगी बहाल करण्याचा निर्णय झाला. ३० जुलै ते १४ आॅगस्ट या कालावधीत ‘वूमेन्स सुपर लीग’चे आयोजन होत असून, त्यासाठी खेळाडूंना परवानगी देण्याची मुदत संपली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सर्वच पूर्णकालीन सदस्य बोर्डांना पत्र पाठविले होते. पण, त्या वेळी बीसीसीआयने यावर चर्चा केली नव्हती. ईसीबीने लीगसाठी आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडीज येथील १८ विदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. संघांची अंतिम यादी एप्रिल महिन्यातच प्रसिद्ध करण्यात आली. (वृत्तसंस्था)‘कोचपदासाठी हिंदी अनिवार्य नाही’ नवी दिल्ली : टीम इंडियाच्या मुख्य कोचपदासाठी हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक तर आहे; पण अनिवार्य नाही. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या जाहिरातीनंतर आज गुरुवारी हे स्पष्टीकरण दिले. मुख्य कोच पदासाठी १० जूनपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यासाठी कालच वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यात नऊ अटी आहेत. त्यातील सहाव्या अटीबद्दल बोर्डाला आज स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. कोचपदाच्या दावेदारासाठी इंग्रजीचे ज्ञान अनिवार्य आहे. हिंदी बोलता येणे आवश्यक तर आहे; पण अनिवार्य नाही, असे बोर्डाचे सचिव अजय शिर्के यांनी स्पष्ट केले.