शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड संघाचा कसून सराव

By admin | Updated: September 15, 2016 01:17 IST

भारत दौऱ्यात आगामी सहा आठवड्यांमध्ये कुठल्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, याची न्यूझीलंड संघव्यवस्थापनाला चांगली कल्पना आहे.

नवी दिल्ली : भारत दौऱ्यात आगामी सहा आठवड्यांमध्ये कुठल्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, याची न्यूझीलंड संघव्यवस्थापनाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे बुधवारी फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये दोन तासांच्या सरावादरम्यान लेग स्पिनर ईश सोढी, आॅफ स्पिनर मार्क क्रेग व डावखुरा फिरकीपटू मिशेल सँटनर या फिरकी त्रिकुटाला बराच वेळ गोलंदाजी करताना बघितल्यानंतर आश्चर्य वाटले नाही. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाणे आव्हान असल्याचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कबूल केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आपल्या फिरकीपटूंविरुद्ध आणि नेट गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीचा कसून सराव केला. सरावादरम्यान फिरकीपटूंसाठी वेगळी नेट तयार करण्यात आली होती. सँटनरने सराव सत्राच्या दुसऱ्या तासात गोलंदाजीला सुरुवात केली, तर सोढी व क्रेग यांनी फिरकीपटूंसाठी असलेल्या नेटमध्ये सुरुवातीपासून गोलंदाजी केली. क्रेगने नेटमध्ये नव्या ‘एसजी’ चेंडूने गोलंदाजी केली. त्यामुळे खेळपट्टी जर फिरकीला अनुकूल असेल, तर तो गोलंदाजीची सुरुवात करू शकतो, असे संकेत मिळत आहेत. तीन फिरकीपटूंमध्ये सोढीने सर्वाधिक वेळ गोलंदाजी केली. सँटनर गोलंदाजीला आला तेव्हा त्याच्याकडे जुना चेंडू सोपविण्यात आला. कर्णधार विल्यम्सनने फलंदाजीचा सराव आटोपल्यानंतर आॅफ स्पिन गोलंदाजी केली, यावरून या मालिकेत फिरकीचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले. न्यूझीलंडच्या कर्णधाराने ५२ कसोटी सामन्यांत २९ बळी घेतले आहेत. जर खेळपट्टीवर चेंडू अधिक वळत असेल, तर त्याला गोलंदाजी करताना बघितले, तर आश्चर्य वाटायला नको. वेगवान गोलंदाज टीम साउदी व ट्रेंट बोल्ट यांनीही सराव केला, तर डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनर जुन्या चेंडूने गोलंदाजी करताना दिसला. दरम्यान, कानपूरच्या ग्रीन पार्कवरील खेळपट्टीचे स्वरूप बघता रिव्हर्स स्विंगवर भर देण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)