शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नायर, गोहिलचा भेदक मारा, मुंबई उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 27, 2016 14:53 IST

गतविजेत्या मुंबईने पुन्हा एकदा रणजी विजेतेपदाच्या दिशेने कूच करताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 27 - गतविजेत्या मुंबईने पुन्हा एकदा रणजी विजेतेपदाच्या दिशेने कूच करताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. प्रत्येकी पाच बळी टिपणाऱ्या अभिषेक नायर आणि विजय गोहिल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत हैदराबादचे आव्हान मोडीत काढले. कालच्या सात बाद 121 वरून पुढे खेळताना हैदराबादच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट प्रतिकार केल्याने मुंबईला अवघ्या 30 धावांनीच विजय मिळवता आला. 
काल मुंबईने विजयासाठी दिलेल्या 232 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नायर आणि गोहिलच्या गोलंदाजीसमोर हैदराबादची अवस्था सात बाद 121 अशी झाली होती. मात्र आज खेळाला सुरुवात झाल्यावर हैदराबादच्या बी. अनिरुद्ध आणि  सी. मिलिंद यांनी चिवट प्रतिकार केला. दोघांनीही आठव्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी करत मुंबईची डोकेदुखी वाढवली. पण मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अभिषेक नायरने मिलिंद (29), मोहम्मद सिराज (0) आणि रवी किरण (1) यांना बाद करत हैदराबादचा दुसरा डाव 201 धावांवर संपुष्टात आणला. हैदराबादकडून एकाकी लढत देणारा अनिरुद्ध 84 धावांवर नाबाद राहिला.  मुंबईच्या अभिषेक नायरने या लढतीत एकूण नऊ बळी टिपले. 
(रणजी स्पर्धेत गुजरातच्या सलामीवीराने रचला विश्वविक्रम)
 
तत्पूर्वी  हैदराबादला विजयासाठी २३२ धावांचे आव्हान दिल्यानंतर चौथ्या दिवसअखेर मुंबईने त्यांची ७ बाद १२१ अशी केविलवाणी अवस्था केली होती.