शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिंकूनही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर!

By admin | Updated: March 22, 2017 00:06 IST

गेल्या वर्षी उपविजेता राहिलेल्या महाराष्ट्र संघाला यंदाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र, मिझोरामने रेल्वेचा ५-१ धुव्वा उडवल्याने

पणजी/वास्को : गेल्या वर्षी उपविजेता राहिलेल्या महाराष्ट्र संघाला यंदाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र, मिझोरामने रेल्वेचा ५-१ धुव्वा उडवल्याने त्याचा परिणाम गुणतालिकेवर झाला. गुणफरकाच्या सरासरीमुळे महाराष्ट्र संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली. महाराष्ट्राला ‘ब’ गटातून तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी बलाढ्य केरळचा २-० ने पराभव केला.वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने केरळवर वर्चस्व राखले होते. ३४ व्या मिनिटाला वैभव शिरळे आणि ५९ व्या मिनिटाला श्रीकांत वीरामल्लू याने शानदार गोल नोंदवले. या विजयानंतर महाराष्ट्र संघाचे एकूण सहा गुण झाले. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र संघाला केवळ एका विजयाची आवश्यकता होती. मात्र, दुसरीकडे, मिझोराम आणि रेल्वे यांच्यातील सामना अनिर्णित राहणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. दुसऱ्या सामन्यात मिझोरामने मात्र रेल्वेचा ५-१ ने धुव्वा उडवला. या निकालाचा फटका महाराष्ट्र संघाला बसला. मिझोराम आणि केरळ यांचे समान गुण होते. केरळ पराभूत झाल्याने मिझोराम दुसऱ्या स्थानावर पोहोचला. आता गुरुवारी (दि. २३) होणाऱ्या उपांत्य फेरीत मिझोरामचा सामना पश्चिम बंगालविरुद्ध तर गोव्याचा सामना केरळविरुद्ध होईल. महाराष्ट्राने असे केले गोल...केरळविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने ३४ व्या मिनिटाला आघाडीचा गोल नोंदवला. अ‍ॅरॉन डिकॉस्ताच्या क्रॉसिंगवर वैभव शिरळे याने चेंडूला जाळीची दिशा दाखविली. त्यानंतर ४० व्या मिनिटाला महाराष्ट्राला आणखी एक गोल करण्याची संधी होती़; परंतु, वैभवचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. मध्यंतरापर्यंत १-० आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने या सत्रातही जोरकस खेळ केला. ५९ व्या मिनिटाला अ‍ॅरोन डिकॉस्ताच्या क्रॉसवर श्रीकांत वीरमल्लूने केरळचा गोलरक्षक मेलर्बन दास याला चकवीत शानदार गोल नोंदवला. केरळने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)