शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

Lovlina Borgohain: भारताच्या लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव; गेल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं 'ब्राँझ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 16:24 IST

Lovlina Borgohain Boxing, India in Paris Olympics 2024: जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या ली कियान हिने केलं पराभूत.

Lovlina Borgohain Boxing, India in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ७५ किलो वजनी गटात बॉक्सिंग प्रकारात भारताच्या लोव्हलिना बोर्गोहेनचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली कियान हिच्याशी तिचा सामना झाला. हा सामना उपांत्यपूर्व फेरीचा होता. लोव्हलिना बोरगोहेनचा ली कियान हिने १-४ असा एकतर्फी पराभव केला. लोव्हलिनाच्या पराभवासोबतच भारताचे पुरुष आणि महिला बॉक्सिंगमधील आव्हान संपुष्टात आले.

ऑलिम्पिक २०२४ मधील प्रवास

पॅरिसमध्ये ३१ जुलैला झालेल्या सलामीच्या फेरीत लोव्हलिनाचा सामना नॉर्वेच्या सुन्नीवा हॉफस्टॅड हिच्याशी झाला होता. त्या सामन्यात लोव्हलिनाने ५-० असा विजय मिळवला होता. संपूर्ण सामन्यात तिने प्रतिस्पर्ध्याला डोकं वर काढण्याची संधीच दिली नव्हती. पण आज उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लोव्हलिनाला दबदबा राखता आला नाही. त्यामुळेच तिला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले.  

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक!

गेल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने मिळवलेल्या ७ पदकांपैकी एक पदक लोव्हलिनाचे होते. तिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ६९ वजनी गटामध्ये कांस्यपदक पटकावले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी आसाम या राज्याची ती पहिली महिला खेळाडू आणि दुसरी बॉक्सर होती. तिने प्राथमिक फेरीत जर्मन बॉक्सर नादिन अपेट्झचा पराभव केला होता. त्यानंतर तैवानच्या चेन निएन-चिनचा पराभव केला होता. त्यावेळीच तिचे पदक निश्चित झाले होते. अखेर कांस्यपदकाच्या सामन्यात लोव्हलिनाने उझबेकिस्तानच्या मेलिएव्हाचा पराभव करून तिने भारतासाठी पदक मिळवले होते.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Lovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईंboxingबॉक्सिंगIndiaभारत