शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडला लोळवत पाकिस्तानने गाठली फायनल

By admin | Updated: June 14, 2017 21:48 IST

बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे ठोकताळे चुकवले. आज

ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 14 - बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे ठोकताळे चुकवले. आज झालेल्या उपांत्य लढतीत सुरुवातीला गोलंदाजांनी केलेला भेदक मारा आणि नंतर माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीरांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासोबत पाकिस्तानने दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. 
 इंग्लंडने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अझर अली आणि फकर झमान यांनी पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही 118 धावांची सलामी देत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. त्यानंतर फकर झमान (57) आणि अझर अली (76) हे बाद झाले. मात्र  बाबर आझम (नाबाद 38) आणि मोहम्मद हाफिझ (नाबाद 31) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण करत पाकिस्तानला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.  
तत्पूर्वी  नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान इंग्लंडचा डाव अवघ्या 211 धावांत आटोपला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथ क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानण्यात येत असलेल्या इंग्लंडचा डाव पाकिस्तानी गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर  गडगडला. सलामीवीर अॅलेक्स हेल्स (13) धावांवर बाद झाला.  त्यानंतर बेअरस्टो (43) आणि जो रूट (46) यांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर 28 व्या षटकात इंग्लंडने 2 बाद 128 अशी मजल मारली होती. पण रूट (46) आणि मॉर्गन (33) धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडला. 
आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने इंग्लंडची धावगती मंदावली. फटकेबाज बेन स्टोक्सलाही पाकिस्तानी माऱ्याचा सामना करताना सावध पवित्रा घ्यावा लागला. मात्र एकीकडून इतर फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतत असताना स्टोक्सने एक बाजू लावून धरत संघाला दोनशेपार मजल मारून दिली. अखेर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात स्टोक्स 34 धावांवर बाद झाला. तो माघारी परतताच इंग्लंडचा डाव संपण्यास वेळ लागला नाही. पाकिस्तानकडून हसन अलीने तीन,  जुनैद खान आणि रुमान रईसने प्रत्येकी दोन आणि शादाब खानने एक गडी बाद केला.  तर इंग्लंडचे दोन फलंदाज धावचीत झाले.