शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

भारत अन् विराटला नंबर वन बनण्याची संधी

By admin | Updated: January 15, 2015 04:17 IST

विश्व चॅम्पियन टीम इंडिया आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याकडे आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेत आयसीसी मानांकनात नंबर वन बनण्याची संधी आहे़

नवी दिल्ली : विश्व चॅम्पियन टीम इंडिया आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याकडे आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेत आयसीसी मानांकनात नंबर वन बनण्याची संधी आहे़ या मालिकेस १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे़ दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातही १६ जानेवारीपासून ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे़ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या वन-डे क्रमवारीत आॅस्ट्रेलिया अव्वल, तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत़ यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो़ आॅस्ट्रेलिया आणि भारताचे प्रत्येकी ११७ गुण आहेत; मात्र कांगारू संघ दशांश गुणाने पुढे आहे़ आफ्रिकेच्या खात्यात ११२ गुण जमा आहेत़ ताज्या फलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स ८८७ गुणांसह नंबर वन आहे़ त्यानंतर कोहली ८६२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे़ या दोन्ही खेळाडूंमध्ये २७ गुणांची तफावत आहे़ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वन-डे मालिकेत दोन्ही खेळाडू एकमेकांना पछाडण्यासाठी प्रयत्नशील असेल़ भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या या मालिकेचा अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली, तर भारत रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेऊ शकतो़ दरम्यान, या स्पर्धेत इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे़ हा देशसुद्धा भारत आणि आॅस्ट्रेलियाच्या अव्वल क्रमांकाच्या मार्गात अडथळा ठरू शकतो़ विशेष म्हणजे, वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप केले, तर आफ्रिका संघही अव्वल क्रमांकावर झेप घेऊ शकतो़ (वृत्तसंस्था)