शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फायनल गाठण्याची आशा

By admin | Updated: January 16, 2015 04:18 IST

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर वन-डेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेला भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढच्या महिन्यात प्रारंभ होत

मेलबर्न : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर वन-डेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेला भारतीय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढच्या महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया जेतेपद राखण्यासाठी गत कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. संघाच्या नव्या वन-डे किटच्या अनावरणप्रसंगी बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आम्ही २०११ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहोत. पण वातावरणातील बदल महत्त्वाची भूमिका बजावणार असून, आम्हाला त्यानुसार खेळावे लागेल. क्रिकेटच्या कुठल्याही स्वरूपासाठी मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) जागतिक क्रिकेटच्या आयोजनासाठी असलेल्या सर्वश्रेष्ठ स्थळांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये आम्ही केलेल्या कामगिरीपेक्षा आम्ही चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, १९ मार्च रोजी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही पुन्हा खेळू, अशी आशा आहे.’’आॅस्ट्रेलियात पुढील दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमध्ये वन-डे क्रिकेटची धूम राहणार आहे. यजमान आॅस्ट्रेलियासह भारत व इंग्लंडचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेनंतर पुढील महिन्यात विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तिरंगी मालिकेत भारताची पहिली लढत एमसीजीवर आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाच्या विश्वकप स्पर्धेच्या मोहिमेला १५ फेब्रुवारीपासून अ‍ॅडलेडमध्ये प्रारंभ होणार आहे. येथे ‘ब’ गटात भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. धोनीने अलीकडेच संपलेल्या भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेत एमसीजीवर अनिर्णीत संपलेल्या तिसऱ्या लढतीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण आता धोनी वन-डे टीमचा कर्णधार म्हणून मैदानावर परतणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले. आपल्या नेहमीच्या शैलीत धोनी म्हणाला, ‘‘मी विश्रांती घेतली. कुठल्याही खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे अभिमानाची बाब आहे. क्रिकेटमध्ये भारतात चुरस असून काहीच खेळाडूंना हा पोशाख (टीम इंडियाची जर्सी) परिधान करण्याची संधी मिळते. त्यामुळे येथे पुन्हा एकदा ही जर्सी परिधान करताना आनंद वाटतो.’’ आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी करणारा कोहली तिरंगी मालिका व त्यानंतर विश्वकप स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.भारतीय संघ बुधवारी येथे दाखल झाला असून, कसोटी मालिकेनंतर पाच दिवसांच्या विश्रांतीचा आनंद घेत संघ आता सरावासाठी सज्ज झाला आहे. तिरंगी मालिका व विश्वकप स्पर्धेसाठी संघात समावेश असलेल्या सर्व खेळाडूंसह रवींद्र जडेजाही येथे दाखल झाला आहे. त्याने क्षेत्ररक्षणाचा सराव केला. जडेजाच्या फिटनेसबाबत अद्याप निश्चित सांगणे घाईचे ठरेल. दरम्यान, सिडनीमध्ये आॅस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीने तिरंगी मालिकेचा प्रारंभ होणार आहे. (वृत्तसंस्था)