शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या संतोषने घडविला इतिहास

By admin | Updated: January 20, 2015 00:16 IST

डोंगरदऱ्यातील अरुंद वाटांतून मार्ग काढत... वाळवंटी वादळाशी टक्कर देत... भारताच्या चुंचुगुप्पो शिवशंकर संतोषने डकार रॅली पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

मुंबई : डोंगरदऱ्यातील अरुंद वाटांतून मार्ग काढत... वाळवंटी वादळाशी टक्कर देत... भारताच्या चुंचुगुप्पो शिवशंकर संतोषने डकार रॅली पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अर्जेंटिना, चिली आणि बोलिविआ असा ९ हजार किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय बाईक रेसरचा बहुमान त्याच्या शिरपेचात रोवला गेला आहे. या स्पर्धेत त्याने ३६वा क्रमांक पटकावला असला तरी त्याची ही कामगिरी इतर भारतीयांसाठी प्रेरणादायीच आहे. स्पॅनिशचा मार्क कोमा याने येथे बाजी मारून पाचवे डकार रॅलीचे जेतेपद नावावर केले, तर पोर्तुगालच्या पाऊलो गोन्साल्विस आणि आॅस्ट्रेलियाच्या टॉबी प्राईस यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.पहिल्यांदाच या रॅलीत सहभागी होणाऱ्या संतोषने टू व्हीलर प्रकारात ३६वे स्थान पटकावले. रॅलीतील टेरमास दी रिओ हाँडो ते रोसारीओ या प्रवासात संतोषने ३०वे स्थान पटकावले होते. एकूण १३ टप्पे त्याने ६० तास ३९ मिनिटे आणि २० सेकंदांत पूर्ण केले. ३५व्या स्थानावर आलेल्या अर्जेंटिनाच्या जेविएर गोमेज याच्याहून ४० मिनिटांनंतर तो शर्यत पूर्ण करू शकला. २०१२मध्ये ‘रेड दी हिमालया’ स्पर्धा जिंकणाऱ्या संतोषने २०१४मध्ये राजस्थानमध्ये पार पडलेल्या ‘डेझर्ट स्टॉर्म$’ स्पर्धेतही बाजी मारली. संतोष म्हणाला, प्रत्येक दिवस हा अडथळ्यांशी झुंज देणारा होता. १६८ रायडर्सने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातील ७९ जणांनाच स्पर्धा पूर्ण करण्यात यश मिळाले. अनेकांनी दुखापती आणि दुर्घटनेमुळे स्पर्धेतून माघार घेतली. यामध्ये २०१४चा उपविजेता जॉर्डी विलाडोम्स आणि जुआन पेड्रेरो यांचाही समावेश होता. जॉन बेरेडा याने १३पैकी तीन टप्पे जिंकण्याचा विक्रम केला, परंतु त्याला अखेर १७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. लैला सांज हिने ९वे स्थान पटकावून महिला रायडरमध्ये सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. (प्रतिनिधी)चिलीचा टप्पा खडतरलहानपणी डकार रॅली टीव्हीवर पाहताना मला विजेत्या स्पर्धकांचे आकर्षण वाटायचे. अशा स्पर्धेत सहभागी होताना पुढे काय होईल हे सुरुवातीलाच सांगू शकत नाही. चिली येथील टप्पा सर्वाधिक खडतर होता. अर्जेंटीना येथील उष्ण वातावरणाने हालत खराब झाली, परंतु या रॅलीचा आनंद मी लुटला. या यशाने भारतीय खेळाडूंसाठी या स्पर्धेचे दरवाजे खुले झाल्याचे संतोष म्हणाला.