शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्ला येथील मुले,भंडारजच्या मुलींनी मारली बाजी शालेय कबड्डी स्पर्धेत अनेक शाळांनी घेतला सहभाग

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

शिर्ला : येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या सर्कलस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये शिर्ला येथील जि.प. शाळेच्या मुलांनी, तर भंडारज येथील जि.प. शाळेच्या मुलींनी बाजी मारली. त्यांनी अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात जिगरबाज खेळ केला.

शिर्ला : येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या सर्कलस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये शिर्ला येथील जि.प. शाळेच्या मुलांनी, तर भंडारज येथील जि.प. शाळेच्या मुलींनी बाजी मारली. त्यांनी अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात जिगरबाज खेळ केला.
दोन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन शिर्ला येथे नुकतेच करण्यात आले होते. उद्घाटन जि.प. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत कबड्डी , खो-खो, लंगडी, व्हॉलीबॉल , क्रिकेट , फुटबॉल या सांघिक क्रीडाप्रकारांचे सामने झाले तसेच तसेच १००, २००, ४०० मीटर शर्यत, टप्पा पद्धतीने धावणे, मल्लखांब या वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्येही विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. शिर्ला व भंडारज ही गावे कबड्डीसाठी पंचक्रोशीत ओळखली जातात. त्यानुसार येथील मुले व मुलींच्या संघाने आपआपल्या गटात बाजी मारली. शिर्ला सर्कलमधील शिर्ला, भंडारज बु. , तांदळी बु., देऊळगाव, भानोरा, मलकापूर, पातूर येथील शाळांच्या संघांनी व खेळाडूंनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. आयोजनासाठी जि.प. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पु. ना. केदार , किशोर निलखन यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
फोटो क्रमांक : ०२ सीटीसीएल ५१
शालेय क्रीडा स्पर्धेत रंगलेल्या कबड्डीच्या सामन्यातील एक क्षण.