शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पहिली कसोटी अ‍ॅडिलेड ओव्हलवर

By admin | Updated: December 2, 2014 01:42 IST

: भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना अ‍ॅडिलेडमध्ये ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

सिडनी : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना अ‍ॅडिलेडमध्ये ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युज याच्या निधनानंतर खेळाडू मानसिक धक्क्यात असल्याने नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिली कसोटी ४ ऐवजी ९ डिसेंबरला अ‍ॅडिलेड
येथे खेळविण्यात येणार असल्याचा दावा येथील स्थानिक वृत्तवाहिनीने केला आहे.
या वाहिनीच्या दाव्यानुसार, ब्रिसबन कसोटी १७ डिसेंबरला, मेलबर्न कसोटी २६ डिसेंबरला आणि अखेरची कसोटी सिडनीत ६ जानेवारीला होणार आहे. या वृत्ताचा सीएकडून इन्कार होत असला, तरी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर मालिकेचे वेळापत्रक टाकण्यात आले आहे. त्यानुसार या मालिकेला ९ डिसेंबरला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील केवळ मेलबर्न कसोटीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गुरुवारपासून ब्रिसबन कसोटीला प्रारंभ होणार होता; परंतु बुधवारी ह्युजच्या अंत्यसंस्कारामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आल्याचे सीएने जाहीर केले.
या मालिकेच्या वेळापत्रकातील बदलावर अनेक चर्चा झाल्या. यात गाबा आणि अ‍ॅडिलेड कसोटीच्या तारखेत बदल, ब्रिसबन सामना शेवटी खेळवावा आदी पर्यायांवर चर्चा करण्यात आली. या बदलांमुळे आगामी तिरंगी मालिकेवरही परिणाम होऊ शकतो. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळाडूंना विश्रांतीसाठी अधिक काळ देण्यात आला आहे. तसेच ४ व ५ डिसेंबरला भारत अ‍ॅडिलेडमध्ये सराव सामना खेळण्यास सज्ज आहे. याआधी सीएने ट्विटरवर जाहीर केले, की भारताविरुद्ध पहिल्या कसोटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही; परंतु ही कसोटी अ‍ॅडिलेडमध्येच खेळविण्यात येईल. सीए आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू आहे.
आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी मात्र अ‍ॅडिलेड हे या कसोटी मालिकेच्या प्रारंभासाठी योग्य स्टेडियम असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही मालिका पाच दिवस पुढे ढकलल्यामुळे दोन्ही संघांना अंतिम संघ निवडण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि मायकल क्लार्क दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळणार नव्हते. मात्र, या निर्णयामुळे या दोघांनाही दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक काळ मिळाला आहे. (वृत्तसंस्था)