शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीने 'या' क्रिकेटपटूसोबत थाटला संसार

By admin | Updated: June 2, 2016 10:35 IST

दिनेशने पहिली पत्नी निकितापासून का घटस्फोट घेतला ? या घटस्फोटाला काय कारण होते ? हे फार कमी जणांना माहित आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २ - भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचे क्रिकेटबरोबरच खासगी आयुष्यही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिले. स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल बरोबरच्या त्याचे प्रेम प्रकरण माध्यमांमध्ये चांगलेच गाजले. दिनेशच्या आयुष्यात अशी आणखी एक खासगी बाब आहे जी फार कमी जणांना माहित आहे. 
 
दिनेशने पहिली पत्नी निकितापासून का घटस्फोट घेतला ? या घटस्फोटाला काय कारण होते ? आणि निकिताने घटस्फोटानंतर कुठल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत संसार थाटला हे फार कमी जणांना माहित आहे. दिनेश कार्तिकने २००४ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. या दरम्यान त्याचे बालपणीची मैत्रिण निकिताबरोबर प्रेम प्रकरण सुरु होते.
 
ब-याच वर्षाच्या प्रेमसंबंधांनंतर त्यांनी २००७ मध्ये लग्न केले. पण त्यांचा संसार पाचच वर्ष टिकला. २०१२ मध्ये दोघे विभक्त झाले. दिनेश आणि निकितामध्ये दुराव्याचे कारण होता मुरली विजय. भारताच्या कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयबरोबर निकिताची जवळीक त्यावेळी वाढली होती.
 
आयपीएलच्या पाचव्या मोसमात २०१२ मध्ये दिनेश कार्तिकला निकिता आणि मुरली विजयच्या प्रेमसंबंधांबद्दल समजल्यानंतर त्याने निकिताला घटस्फोट दिला. घटस्फोट घेताच निकिताने मुरली विजयबरोबर लग्न केले. त्यानंतर २०१३ मध्ये एका कार्यक्रमामध्ये दिनेश आणि दिपिकाची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले.