शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत होऊनही बांगलादेशने रचला अनोखा विक्रम

By admin | Updated: June 16, 2017 17:03 IST

काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत

ऑनलाइन लोकमत
मँचेस्टर, दि. 16 -  काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत भारतीय संघाने 9 गडी राखून अगदी आरामात विजय  मिळवला. मात्र भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने या लढतीत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी एकही अतिरिक्त धाव दिली नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न  देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने केला आहे.
पहिल्यांदाच आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या बांगलादेशने भारतीय संघासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण बलाढ्य भारतीय संघासमोर त्यांची डाळ शिजली नाही.  बांगलादेशने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बघता बघता पार केले. मात्र बांगलादेशी गोलंदाजांचा मारा स्वैर झाला तरी त्यांनी अवांतर धावा मात्र दिल्या नाहीत. भारताच्या संपूर्ण डावात वाइड आणि नोबॉल सोडाच साध्या बाय आणि लेग बायच्या धावाही बांगलादेशी संघाने दिल्या नाहीत. (... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !)
 
संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने याआधीही केला होता. गेल्या वर्षी आशिया चषक ट्वेंटी-20 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढीतीत बांगलादेशी गोलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. त्यावेळी त्यांनी   संपूर्ण डावात एकही अवांतर धाव दिली नव्हती.