शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

चेतेश्वर पुजाराचे दमदार द्विशतक

By admin | Updated: September 12, 2016 00:42 IST

भरवशाचा चेतेश्वर पुजारा याने केलेली नाबाद २३५ धावांची दमदार द्विशतकी खेळी आणि शेल्डॉन जॅक्सनचा (१३४) शतकी तडाखा या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप ट्रॉफीच्या

ग्रेटर नोएडा : भरवशाचा चेतेश्वर पुजारा याने केलेली नाबाद २३५ धावांची दमदार द्विशतकी खेळी आणि शेल्डॉन जॅक्सनचा (१३४) शतकी तडाखा या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंडिया रेडविरुद्ध दुसऱ्या दिवशी १५८ षटकांत ६४५ धावांची मजबूत धावसंख्या उभारली आहे. विशेष म्हणजे पुजारा व जॅक्सन यांनी पाचव्या विकेटसाठी २४३ धावांची भागीदारी करून रेड संघाला चांगलेच दमवले.पुजाराने ३४० चेंडूंत तब्बल २६ चौकार मारताना नाबाद २३४ धावा काढल्या आहेत. पुजाराने यासह आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीमध्ये १० हजार धावांचा टप्पाही पार केला, तर जॅक्सन २०४ चेंडंूत १५ चौकार व २ षट्कारांसह १३४ धावा काढून बाद झाला. जॅक्सनने देखील यावेळी आपल्या प्रथम श्रेणीमध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी ३ बाद ३६२ धावांवरून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्याच षटकात ५५ धावांवर खेळत असलेला दिनेश कार्तिक वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मात्र, यानंतर पुजारा-जॅक्सन यांनी संघाला केवळ सावरलेच नाही, तर मजबूत स्थितीमध्ये आणले. पुजाराने आपले ३३ वे प्रथमश्रेणी शतक झळकावले, तर जॅक्सनने ११ वे प्रथम श्रेणी शतक झळकावले. या दोघांच्याही तडाख्यापुढे रेड संघाचे सर्वच गोलंदाज हतबल झाले. परंतु, फिरकी गोलंदाज अमित मिश्राने महत्त्वपूर्ण कामगिरी करताना १५०व्या षटकात आपल्या गोलंदाजीवर जॅक्सनला झेलबाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले. यानंतर खेळपट्टीवर आलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने पुजाराला योग्य साथ देताना आक्रमक फलंदाजी केली. जडेजा २६ चेंडंूत प्रत्येकी एक चौकार व षट्कारासह नाबाद २२ धावांवर खेळत आहे. अमित मिश्राने १६६ धावांत २ बळी घेतले असून, प्रदीप सांगवान, स्टुअर्ट बिन्नी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)