हा दिवस विसरू शकत नाही : कोहली

By Admin | Updated: January 13, 2015 02:29 IST2015-01-13T02:29:58+5:302015-01-13T02:29:58+5:30

हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली याने स्वीत्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याची भेट घेतल्यानंतर दिली आहे़

Can not forget this day: Kohli | हा दिवस विसरू शकत नाही : कोहली

हा दिवस विसरू शकत नाही : कोहली

सिडनी : हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली याने स्वीत्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याची भेट घेतल्यानंतर दिली आहे़
टीम इंडिया सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे़ रविवारी फेडरर याने एटीपी टूरवर १ हजारावा विजय मिळवितानाच ब्रिस्बेन ओपनचा किताब आपल्या नावे केला होता़
स्टार फलंदाज कोहली याने सोमवारी १७ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररची भेट घेतली़ यानंतर कोहलीने टष्ट्वीट केले, की स्टार टेनिसपटू फेडररला भेटता आले, याचा आनंद आहे़ हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही़ मैदानावर आणि मैदानाबाहेरसुद्धा हा खेळाडू महान आहे, यात शंका नाही़ कोहलीने फेडररसोबतचा फोटोसुद्धा टष्ट्वीटवर पोस्ट केला आहे़ दरम्यान, आॅस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्हन स्मिथ यानेसुद्धा फेडररची भेट घेतली़ त्याने टष्ट्वीट केले, की माझ्या आवडत्या खेळाडूला भेटता आले, याचा आनंद आहे़ या अनुभवी खेळाडूला आगामी आॅस्ट्रेलियन ओपनसाठी शुभेच्छा़ या वेळी डेव्हिड वॉर्नरही उपस्थित होता़
(वृत्तसंस्था)

Web Title: Can not forget this day: Kohli