शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशच्या ५ बाद २२१ धावा

By admin | Updated: October 22, 2016 01:05 IST

बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तिन्ही सत्रांमध्ये अखेरच्या क्षणी विकेट गमावल्या असल्या तरी सलामीवीर तमीम इक्बालच्या

चितगाव : बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तिन्ही सत्रांमध्ये अखेरच्या क्षणी विकेट गमावल्या असल्या तरी सलामीवीर तमीम इक्बालच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात २९३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावा फटकावल्या. बांगलादेशला इंग्लंडची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी ७२ धावांची गरज असून त्यांच्या पाच विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा दोन षटकांचा खेळ शिल्लक असताना बांगलादेशने कर्णधार मुशफिकर रहीमला (४८) गमावले. त्याला बेन स्टोक्सने माघारी परतवले. तमीम इक्बालने (७८) बांगलादेशचा डाव सावरला. बांगलादेशने उपहारापूर्वी अखेरच्या षटकात इमुरुल कायेस (२१) आणि मोमिनुल हक (०) यांच्या विकेट गमावल्या. आॅफ स्पिनर मोईन अलीने (२-६६) या दोघांना तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर तमीम व महमुदुल्ला (३८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. चहापानाला खेळ थांबण्यापूर्वी महमुदुल्ला याला आदिल राशिदने बाद केले. तमीमचा अडथळा गॅरेथ बॅटीने दूर केला. बांगलादेशची भिस्त अष्टपैलू शाकिब अल हसनवर अवलंबून आहे. शाकिब ३१ धावा काढून खेळपट्टीवर असून त्याला दुसऱ्या टोकावर शफीउल इस्लाम (०) खाते न उघडता साथ देत होता. त्याआधी, कालच्या ७ बाद २५८ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने आज ३५ धावा जोडून उर्वरित ३ फलंदाज गमावले. पहिला कसोटी सामना खेळणारा बांगलादेशचा १८ वर्षीय आॅफ स्पिनर मेहदी हसनने स्टुअर्ट ब्रॉडला बाद करीत इंग्लंडचा डाव गुंडाळला. मेहदीने ८० धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. डावखुरा फिरकीपटू ताईजुल इस्लामने उर्वरित दोन फलंदाजांना माघारी परतवले. त्याने ख्रिस व्होक्स (३६) व आदिल राशिद (२६) यांना तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)