हरभजनच्या लग्नात बाऊन्सर्सची कॅमेरामन्सना धक्काबुक्की

By Admin | Updated: October 30, 2015 12:12 IST2015-10-30T12:12:03+5:302015-10-30T12:12:17+5:30

भारतीय गोलंदाज हरभजन सिंग व अभिनेत्री गीता बसरा यांच्या विवाहादरम्यान मीडियाच्या कॅमेरामन्सना बाऊन्सर्सनी धक्काबुक्की केली तसेच कॅमेराही तोडला

Bamboo's Cameramon shocks Harbhajan's wedding | हरभजनच्या लग्नात बाऊन्सर्सची कॅमेरामन्सना धक्काबुक्की

हरभजनच्या लग्नात बाऊन्सर्सची कॅमेरामन्सना धक्काबुक्की

ऑनलाइन लोकमत

चंडीगड, दि. ३० - भारतीय गोलंदाज हरभजन सिंग व अभिनेत्री गीता बसरा या दोघांचा विवाहसोहळा काल मोठ्या धूमधडाक्यात पार पडला खरा मात्र हा सोहळा कव्हर करण्यासाठी आलेल्या मीडियाच्या कॅमेरामन्सना बाऊन्सर्सनी मारहाण करून त्यांचे कॅमेरे तोडल्याने या सोहळ्याला गालबोट लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन बाऊन्सर्सना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
लग्नसोहळा पार पडल्यानंतर हरभजन व गीता घरी परतले आणि वधूच्या गृह प्रवेशाचा विधी सुरू झाला, मात्र ते फोटो टिपण्यासाठी कॅमेरामन्सची धावपळ सुरू झाली. त्याचवेळी तेथील बाऊन्सर्सनी कॅमेरामन्सना रोखले आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले, काही जणांना तर जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मीडियाने हरभजनच्या घराबाहेर आंदोलन केले असता खुद्द हरभजनने बाहेर येऊन घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि वातावरणातील तणाव निवळला. 

Web Title: Bamboo's Cameramon shocks Harbhajan's wedding