शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई ज्यु. टेबल टेनिस स्पर्धा मुंबईत

By admin | Updated: September 11, 2014 01:47 IST

भारतातील टेबल टेनिसला एक वेगळी उंची गाठून देण्यासाठी मुंबई शहर जिल्हा संघटनेच्या (एमसीडीटीटी) गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे

मुंबई : भारतातील टेबल टेनिसला एक वेगळी उंची गाठून देण्यासाठी मुंबई शहर जिल्हा संघटनेच्या (एमसीडीटीटी) गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्याचे फलित म्हणजे २०व्या रिलायन्स आशियाई ज्युनिअर आणि कॅडेट टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाचा मान मुंबईला मिळाला आहे. प्रो कबड्डीसारख्या मेगा इव्हेंटचे यशस्वी आयोजन केल्यानंतर एनएससीआय स्टेडियममध्येच १२ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. जवळपास १६ देशांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, अव्वल पाच संघांना नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या विश्व ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू चिनी आव्हान परतवून या सुवर्णसंधीचा फायदा उचलण्यासाठी प्रयत्नशील असतील. मुंबईत बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली.ही स्पर्धा आशियाई टेबल टेनिस युनियन, टेबल टेनिस फेडरेशन आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. माजी टेबल टेनिसपटू फारूक खोडाईजी (१९६७), केटी खोडाईजी (१९७१), कमलेश मेहता (१९८५), मोनालिसा मेहता (१९८७) आणि एऩ आऱ बजाज (१९७३) या आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत भारतासह चीन, जपान, कोरिया, सिंगापूर, चायनीज तायपै, थायलंड, जॉर्डन, कजाकस्तान, इराण, हाँगकाँग आणि कतार आदी देशांचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)