शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

अलीम दार यांना हटविण्याच्या निर्णयाचे आश्चर्य - रमीज

By admin | Updated: October 23, 2015 01:33 IST

पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजा याने पाकिस्तानी पंच अलीम दार यांना भारत व दक्षिण आफ्रिका मालिकेतून हटविण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजा याने पाकिस्तानी पंच अलीम दार यांना भारत व दक्षिण आफ्रिका मालिकेतून हटविण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.शिवसेना कार्यकर्ते बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कार्यालयात घुसल्यानंतर पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी होणारी चर्चा रद्द करावी लागल्यानंतर, आयसीसीने सोमवारी पाकिस्तानी पंच अलीम दार यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांतून हटविण्याचा निर्णय घेतला होता.रमीज राजा म्हणाला की, ‘असे करून आयसीसी सर्वांना काय संदेश देऊ इच्छिते याचे कोडे मला कळत नाही. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना भारतात पंच अलीम दर यांची सुरक्षा ठेवण्यासाठी आयसीसी सांगेल, असे वाटले होते. विशेष म्हणजे पुढील वर्षी भारताच्या विविध शहरांत टी-२0 वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. त्यामुळे त्यांचे धोरण आपल्याला समजत नाही. आयसीसीने सोपा मार्ग निवडला, परंतु कोणत्याही मालिकेदरम्यान सर्वच सामना अधिकाऱ्यांना सुरक्षा निश्चित करण्याची आयसीसीची जबाबदारी आहे.’दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंच असद रऊफ यांनी दार यांना धोक्याच्या कारणांमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला असेल. दार यांच्या सुरक्षितेविषयी आयसीसीला चिंता नसेल, तर ते त्यांना वापस का पाठवतील, असा प्रश्न उपस्थित केला.