शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

उद्या धावणार ४० हजार स्पर्धक!

By admin | Updated: January 17, 2015 03:08 IST

जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे ‘मुंबई मॅरेथॉन’ हे समीकरण ठरलेलेच. त्यासाठी केवळ मुंबईकरच नव्हे, तर भारतीयांसह

मुंबई : जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे ‘मुंबई मॅरेथॉन’ हे समीकरण ठरलेलेच. त्यासाठी केवळ मुंबईकरच नव्हे, तर भारतीयांसह जगातील अव्वल धावपटू आतुरतेने वाट पाहतात. यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीत १२व्या वर्षात पदार्पण करणारी ही मॅरेथॉन १८ जानेवारीला होत आहे. या ग्लोबल स्पर्धेसाठी गेले दोन महिने कसून सराव करणाऱ्यांना आपापल्या क्षमतेची चाचपणी करण्याची संधी त्यानिमित्ताने मिळेल. हवामानातील बदलांमुळे मुंबईचा गारवा वाढला आहे आणि अशा पोषक वातावणात यंदा अनेक विक्रम होण्याची आशा आयोजकांकडून व्यक्त होत आहे. या स्पर्धेत यंदा ४०,४८५ धावपटूंनी सहभाग घेतला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून पहाटे ५:३० वाजता हौशी धावपटूंच्या शर्यतीला सुरुवात होणार असून, पूर्ण मॅरेथॉनचे बिगुल ७ वाजता वाजणार आहे. आंतरराष्ट्रीय धावपटूंना टक्कर देण्यासाठी या वेळी भारतीय धावपटूही सज्ज झाले आहेत. शर्यत सीएसटीपासून राजीव गांधी सागरी सेतूवरून पुन्हा सीएसटी येथे संपेल. ४२ किलोमीटरच्या या शर्यतीत गतवर्षी पुरुष गटात युगांडाच्या जॅक्सन किप्रोप याने २ तास ०९ मिनिटे व ३२ सेकंदांची नोंद करून, तर महिला गटात केनियाच्या वॅलेंटाइन किपकेटर हिने २ तास २४ मिनिटे व ३३ सेकंदांची नोंद करून कोर्स विक्रमाची नोंद केली होती. हा विक्रम यंदा मोडेल असा विश्वास मुंबई मॅरेथॉनचे प्रमुख ह्युज जोन्स यांनीही व्यक्त केला आहे. ते म्हणाले, या वर्षीचे वातावरण थंड आणि अ‍ॅथलिट्सना सर्वोत्तम कामगिरीस पोषक आहे. त्यामुळे गतवर्षी झालेले विक्रम यंदा मोडू शकतात. भारतीय एलिट गटात गतविजेती ललिता बाबर हिनेही आपल्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्धार बोलून दाखविला. गतवर्षी जेतेपद पटकावताना तिने २ तास ५० मिनिटे व ३१ सेकंदांची नोंद करीत बाजी मारली होती. यंदा मात्र त्यात सुधारणा करून २ तास ४४ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, २२ ते ३० आॅगस्ट या कालावधीत बीजिंगमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता मिळविण्यासाठी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची आहे. आशियाई स्पर्धेनंतर मुंबई मॅरेथॉनसाठी दोन महिने कसून सराव केला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)