शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

12 साल बाद.. भारत अंतिम फेरीत

By admin | Updated: October 1, 2014 02:00 IST

भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

 पाकविरुद्ध सुवर्णपदकासाठी झुंज : कोरीयाचा 1-क् ने पराभव

 
इंचियोन : आकाशदीप सिंगच्या शानदार मैदानी गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान सुवर्णपदकासाठी झुंज रंगणार आहे. 
भारताने पहिल्या दोन क्वॉर्टरमध्ये गोल करण्याच्या तीन नामी संधी गमावल्यानंतर आकाशदीपने 44 व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. अखेर आकाशदीपने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.  
यापूर्वी 2क्क्2 च्या बुसान आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविणा:या भारतीय पुरुष हॉकी संघाला फायनलमध्ये गुरुवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानने आज दुस:या उपांत्य लढतीत 2क्1क् ग्वांग्झू आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाचा शूटऑफमध्ये 6-5 ने पराभव केला. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघाला 2क्16 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. साखळी फेरीत पाकविरुद्ध 1-2 ने पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला अंतिम फेरीत या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे. 
आशियाई स्पर्धेत कोरियाविरुद्धच्या 14 सामन्यांतील भारताचा हा आठवा विजय आहे. कोरियाविरुद्ध आजतागायत खेळल्या गेलेल्या एकूण 72 सामन्यांपैकी भारताचा हा 29 वा विजय आहे. आज खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले. कोरिया संघाला भारताचा बचाव भेदण्यात अपयश आले. भारतीय संघाने सातत्याने कोरियाच्या गोलक्षेत्रत मुसंडी मारली तर प्रतिस्पर्धी संघ त्यात अपयशी ठरला. 
दुस:या क्वॉर्टरच्या तिस:या मिनिटाला भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण प्रतिस्पर्धी संघाचा गोलकीपर ली याने व्ही. रघुनाथचे प्रयत्न हाणून पाडले. रमणदीप सिंग व गुरविंदरसिंग चांडी यांची कामगिरी निराशाजनक ठरली. पण वीरेंद्र लाक्रा, रघुनाथ, मनप्रीत सिंग व रूपिंदरपाल सिंग यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. गुरुबाजाने चमकदार कामगिरी केली. त्याला सुनीलने योग्य साथ दिली. आकाशदीपने 44 व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. पिछाडीवर पडलेल्या कोरियन संघाने अखेरच्या क्वॉर्टरमध्ये आक्रमक खेळ केला. पण भारताचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना कोरियाला पहिला व एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारताने  उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न हाणून पाडले. (वृत्तसंस्था)