शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरण गरजेचे - सुरेश प्रभू

By admin | Updated: January 10, 2015 01:57 IST

समाजाचा विकास साधायचा असेल तर आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांना मोकळीक मिळणे गरजेचे असून, त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

मुंबई : समाजाचा विकास साधायचा असेल तर आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांना मोकळीक मिळणे गरजेचे असून, त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शुक्रवारी पार पडलेल्या ६४व्या दीक्षान्त समारंभादरम्यान सुरेश प्रभू बोलत होते. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कुलगुरू डॉ. वसुधा कामत आणि किशोरी आमोणकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश प्रभू म्हणाले, लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवायचे असेल तर आरक्षणाची आवश्यकता आहे. महिलांना राजकारण आणि आर्थिक अशा दोन्ही क्षेत्रांत स्वातंत्र्य दिले पाहिजे. समाजातल्या सर्वच क्षेत्रांत महिलांचा सहभाग कसा वाढेल याबाबत विचार करण्याची गरज आहे.
किशोरी आमोणकर यांना या वेळी संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्यासागर राव यांच्या हस्ते डी.लिट पदवी प्रदान करत सन्मानित करण्यात आले. समारंभादरम्यान पीएच.डी., एमफिल, मास्टर्स करणाऱ्या १५ हजार ६०० विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान केल्या. तसेच ७० पीएच.डी. आणि १२ एम.फिल पदव्या प्रदान केल्या. (प्रतिनिधी)