शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
4
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
5
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
6
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
7
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
9
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
10
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
11
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
12
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
13
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
14
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
15
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
16
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
17
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
18
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
19
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
20
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

३० ते ३५ तासांनी पाणी; तेही अनियमित

By admin | Updated: January 20, 2015 00:07 IST

ठाणे महापालिकेचा कर्ज बुडव्यांचा एरीया म्हणून प्रभाग क्रमांक १४ कडे पाहिले जाते. या प्रभागात इमारती कमी असून चाळी आणि अनधिकृत बांधकामांचा भरणा आहे.

अजित मांडके ल्ल ठाणे
ठाणे महापालिकेचा कर्ज बुडव्यांचा एरीया म्हणून प्रभाग क्रमांक १४ कडे पाहिले जाते. या प्रभागात इमारती कमी असून चाळी आणि अनधिकृत बांधकामांचा भरणा आहे. सोईसुविधांपासून हा प्रभाग वंचित असून आरोग्य केंद्र नाही. रस्ते आहेत, परंतु ते निमुळते असल्याने या प्रभागताही मोठी वाहने जाणे अवघडच आहे. शौचालय, गार्डन, आदींसह इतर सुविधांचीदेखील वानवा आहे.
प्रकर्षाने भेडसावणारी समस्या म्हणून, पाण्याच्या समस्येकडे आजही पाहिले जाते. २००२ मध्ये, या भागाला १७ दशलक्षलीटर पाणी मिळत होते. परंतु, आता ५७ दशलक्ष लीटर पाणी मिळूनही आजही येथे उंच भागांना कमी दाबाने पाणी येत आहे. विशेष म्हणजे १० ते २० तासांच्या फरकाने पाणी येणे आवश्यक असतांना येथे, ३० ते ३५ तासांच्या अवधीने पाणीपुरवठा केला जात असून तो देखील अवेळी होत असल्याने येथील रहिवासी हैराण आहेत.
महापालिकाच नव्हे अनेक बँकाचे कर्ज घेऊन न फेडणाऱ्यांमध्ये हा प्रभाग आघाडीवर असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे बहुतेक बँकांनी या प्रभागाची ओळख एनपीए एरिया अशीच केली आहे. या प्रभागावर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या प्रभागाची लोकसंख्या ३० ते ३५ हजार असली तरी येथील मतदारांची संख्या, १९ हजार ८४० एवढी असून येथे ६० टक्के झोपडपट्टी आणि ४० टक्के इमारती येथे आहेत. लोकमान्य पाडा नं. २, मैत्री पार्क, नंदा पार्क, लक्ष्मी पार्क फेज २, शिवकृपा सोसायटी, झांजे नगर, गणपती मंदिर परिसर, गणेश दर्शन अपार्टमेंट, ठाकूर कॉमप्लेक्स, ठाकूर विद्यालय आदी परिसर येथे येतात.
दुसरीकडे रस्त्यांची अवस्था देखील फारशी चांगली नसून अतिशय दाटीवाटीने येथे रहिवासी वास्तव्य करतांना दिसतात. रस्ते अरुंद असल्याने टेकडीपर्यंत रिक्षा अथवा इतर वाहने जात नाहीत. त्यात सर्व भागात अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकामे वाढल्याने याठिकाणी मैदान, गार्डन या सुविधांची देखील वानवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था देखील फारशी चांगली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
शौचालयांच्या दुरुस्ती झाली असली तरी ५० शौचालयांच्या सफाईसाठी केवळ एकच व्यक्ती असल्याने ती वेळेवर होत नाही. त्यात येथे रात्री ८ नंतर महिलांचे रस्त्यावर येण्याचे प्रमाण फारच कमी असून येथे रात्री एकट्या दुकट्या फिरणाऱ्या महिलांना चोरट्यांची भीती वाटते. त्यात येथे पोलीस चौकी देखील नसल्याने चोरांनी देखील येथे आपली दहशत कायम ठेवली आहे. त्यातही येथे स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिकांना थेट कामगार रुग्णालय परिसरात असलेल्या स्मशानभूमीकडे जावे लागते. रस्ते असले तरी काही भागात सिमेंट रस्ते होणे अपेक्षित आहे. तसेच अरुंद रस्त्यामुळे साधी अ‍ॅम्ब्युलन्स वरपर्यंत जाऊ शकत नाही.

रस्ते, गटार, पायवाटा, शौचालयांची कामे केलेली आहेत. पाण्याचीही समस्या सोडविलेली आहे. मात्र, आजही या भागात हवे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. १८ ते २० तासांच्या फरकाने पाणी यावे अशी आमची मागणी आहे. परंतु,आजही ती पूर्ण होऊ शकलेली नाही.
- हणमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक, राष्ट्रवादी

या प्रभागाला कर्ज बुडव्यांचा एरिया म्हणून ओळखले जाते. परंतु येथे समस्या अधिक आहेत. पाणी, शौचालय, गार्डन, मैदान आदींसह इतर मुलभूत सुविधांसाठी येथील नागरीकांना झगडावे लागत आहे.
- सचिन मोरे, स्थानिक नागरीक

रस्ते अरुंद असल्याने मोठी वाहने तर उंच भागात जात नाहीत, त्यात रिक्षावाले देखील लोकमान्य डेपोजवळच सोडत असल्याने, डेपोपासून टेकडीपर्यंत जवळ - जवळ एक ते दिड किमीचे अंतर पायीच कापावे लागत आहे.
- किरण वाघ, स्थानिक नागरीक