शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

सारसोळे येथे सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 10, 2015 01:49 IST

सारसोळे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जबरी दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामधे पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई : सारसोळे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जबरी दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामधे पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सारसोळे (नेरूळ) सेक्टर ६ येथे राहणाऱ्या विनंती रवींद्र पाटील (३१) यांच्या घरी दरोड्याची घटना घडली. विनंती 'ा नवी मुंबई पोलीस कर्मचारी असून त्या मुख्यालयात कार्यरत आहेत, तर त्यांचे पती रवींद्र पाटील हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. सारसोळे गाव येथे काही दिवसांपूर्वीच ते राहायला आले होते. त्यानुसार वरच्या मजल्याचे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर ते लहान मुलासह राहत होते. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक चोर त्यांच्या घरात घुसला. स्वयंपाक खोलीची स्लायडिंग खिडकी उघडून त्याने घरात प्रवेश केला होता. मात्र घरात घुसलेला चोर अंधारामुळे घरातील भांड्यांना धडकला. त्यामुळे भांड्यांचा आवाज झाल्याने दोघाही पती-पत्नीला जाग आली. घरामधे कोण घुसले आहे हे पाहण्यासाठी दोघेही स्वयंपाक खोलीमधे गेले असता त्यांना समोरच एक चोर उभा असल्याचे दिसले. त्यांनी धाडसाने या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरट्याने त्याच्याकडील धारदार हत्याराने पती-पत्नीवर वार केले. परंतु जखमी अवस्थेत त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न करूनही अखेर चोरट्याने पळ काढला. चोरट्याच्या या हल्ल्यात पाटील दाम्पत्याच्या हातावर आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नेरूळच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोड्याच्या घटनेवेळी पाटील यांचे दीड महिन्याचे बाळ देखील त्यांच्यासोबत घरामध्ये होते. सुदैवाने त्याला कसलीही दुखापत झालेली नाही.
याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीसाठी घरात घुसलेल्या चोरट्याला पाटील दाम्पत्याने प्रतिकार केल्याने पळ काढावा लागला आहे. परंतु एक चोर घरात घुसला असताना त्याचे काही साथीदार घराबाहेर उभे होते असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश पालांडे यांनी सांगितले. सशस्त्र दरोड्याच्या या प्रकारामुळे सारसोळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)