शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बँक बुडाल्याची अफवा

By admin | Updated: October 14, 2015 02:55 IST

बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेने तब्बल ६,१७२ कोटी रुपये बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून हाँगकाँगला पाठविले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर

कर्जत: बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेने तब्बल ६,१७२ कोटी रुपये बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून हाँगकाँगला पाठविले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या शाखेचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी सीबीआयच्या विविध पथकांनी शनिवारी बँकेच्या दिल्लीतील काही शाखांची कसून झडती घेतली होती. पाच वर्षांपूर्वी पेण अर्बन बँक बंद झाल्याने अनेकांचे पैसे अडकले आहेत. याचा धसका घेतल्याने ेखातेदारांनी पैसे काढण्यासाठी नेरळ येथील शाखेत प्रचंड गर्दी केली होती.बातमी सर्वत्र पसरल्यानंतर नेरळच्या बँक आॅफ बडोदाच्या शाखेत या घटनेचे पडसाद उमटले. ही बँक बंद होणार, अशी भीती खातेदारांमध्ये निर्माण झाली. मात्र दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेचा इतर कोणत्याही शाखेतील खातेदाराला त्याचा त्रास होणार नसून, पैसे आमच्या बँकेत सुरक्षित जमा आहेत. ही बँक बुडणार नाही, असा विश्वास यावेळी नेरळ शाखेच्या व्यवस्थापकांंनी खातेदारांना दिला. मंगळवारी सकाळी बँकेची इंटरनेट सेवा काही काळापुरती बंद झाली होती. त्यावेळी बँकेने आपले आर्थिक व्यवहार हे थांबवले होते. तेव्हा बँकेत उपस्थित असलेल्या खातेदारांमध्ये बँक बंद होणार याची आणखी भीती निर्माण झाली. काही वेळाने मात्र इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर बँकेचे व्यवहार पूर्ववत झाले.बँक बुडण्याची ही अफवा आहे. खातेदारांनी यावर विश्वास ठेवू नये. खातेदारांना आपल्या खात्यातून रक्कम काढायची असल्यास माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन व्यवस्थापकांनी केले आहे. (वार्ताहर)