शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

शेकापचा बालेकिल्ला अबाधित

By admin | Updated: October 20, 2014 03:26 IST

अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापने शिवसेना, काँग्रेस, भाजपाचा धुव्वा उडवित आपली विजयी मोहर उमटवली

अलिबाग : अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापने शिवसेना, काँग्रेस, भाजपाचा धुव्वा उडवित आपली विजयी मोहर उमटवली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्यातही त्यांना यश आले. पंडित पाटील यांच्या यशाने शेकापचा बालेकिल्ला अबाधित राहीला आहे. पंडित पाटील यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात जल्लोषाचे वातावरण होते. बारावी पास असणारे शेकापचे सुभाष तथा पंडीत पाटील यांनी ७६ हजार ९५९ मते मिळवित मतदारांच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांना ६० हजार ८६५ आणि काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांना केवळ ४५ हजार ८५३ मतांवर समाधान मानावे लागले.पाटील यांनी दळवी यांचा १६ हजार ९४ मतांनी पराभव केला तर, ३१ हजार १०६ अशा प्रचंड मतांनी काँग्रेसच्या ठाकूर यांचा सुपडासाफ करण्यात पाटील कमालीचे यशस्वी झाले. अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. भाजपाचे प्रकाश काठे यांना सहा हजार ५४ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश मोहिते यांना तीन हजार ५००, बसपाचे अनिल गायकवाड या राजकीय पक्षांचे डिपॉझीट जप्त झाले. अन्य नऊ अपक्ष उमेदवारांनाही आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. त्यामध्ये हुन्साबीबी हळदे या अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. एकूण मतांच्या एक शष्टांश मते उमेदवारांना मिळाली तर त्याचे डीपॉझीट वाचू शकते असे, निवडणूक निर्णय अधिकारी दिपक क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.