शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेला हवे आहेत ४४ अधिकारी

By admin | Updated: December 23, 2016 03:35 IST

नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची व्याप्ती मोठी आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांसह नगर परिषदेत

वैभव गायकर / पनवेल नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची व्याप्ती मोठी आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांसह नगर परिषदेत क्षेत्राची लोकसंख्या १0 लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत महापालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. महापालिकेचा कारभार गतिमान करण्याच्या दृष्टीने आणखी ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक मिळावी, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्राची २0११ च्या जनगणनेनुसार ५ लाख ९0 हजार लोकसंख्या आहे. प्रत्यक्षात मात्र हा आकडा दहा लाखांच्या घरात तसेच महापालिकेचे क्षेत्रफळ १११0.0६ चौ. कि.मी. म्हणजेच शेजारच्या नवी मुंबई महापालिकेपेक्षा अधिक आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात २९ गावांसह नगरपरिषदेचे क्षेत्र, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, विशेष आर्थिक क्षेत्र, आंतरराष्ट्रीय विमानतळ आदींचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात लोकसंख्यावाढीचे प्रमाण जवळपास ७३ टक्के इतके आहे. या संपूर्ण क्षेत्राचा कारभार हाकण्यासाठी सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांची अतिरिक्त फौज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. शिंदे यांनी १६ नोव्हेंबर रोजी नगरविकास विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून आणखी ४४ अधिकारी व कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून या मागणीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आवश्यक अधिकाऱ्यांची पदे अतिरिक्त आयुक्त (२ ), उपायुक्त (७ ), मुख्य दक्षता अधिकारी (१ ), सहाय्यक आयुक्त (१३ ), मूल्य निर्धारक, कर संकलन अधिकारी (१ ), सहाय्यक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी (१ ), महिला व बालविकास अधिकारी (१ ), समाज विकास अधिकारी (१ ), कायदा, विधी अधिकारी (१ ), सुरक्षा अधिकारी (१ ), सांख्यिकी अधिकारी (१ ), अधीक्षक (१ ), मुख्य लेखा अधिकारी (१), लेखा अधिकारी (१ ), मुख्य लेखा परीक्षक (१), सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी (१ ), पशू शल्य चिकित्सक, संबंधित अधिकारी (१ ), कार्यकारी अभियंता (२ ), उप अभियंता (४ ), उप अभियंता (पाणीपुरवठा) (१ ), सहाय्यक संचालक नगर रचना (१ ), सिस्टीम मॅनेजर, ई-प्रशासन (१), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ ), वैद्यकीय अधीक्षक (१ ), शिक्षणाधिकारी (१ ), प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ (२ ), मुख्य अग्निशमन अधिकारी (१), सहाय्यक अग्निशमन अधिकारी (१)