शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रात ‘नो पार्किंग’

By admin | Updated: November 9, 2016 04:08 IST

गेल्या काही वर्षांत शहरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : गेल्या काही वर्षांत शहरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक विभागाने संपूर्ण महापालिका क्षेत्रात जवळपास दोनशे ठिकाणांवर नो पार्किंगचा प्रस्ताव आणला आहे. विशेष म्हणजे यात वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे.शहराची सध्याची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यानुसार वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. असे असले तरी शहरात पार्किंगचे नियोजन फसले आहे. वाहन पार्किंगच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने वाटेल तेथे वाहने उभी केली जातात. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. शिवाय वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने दळणवळणाचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाने वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरातील २0५ ठिकाणी नो पार्किंग, सम-विषय पार्किंग व समांतर पार्किंगचा प्रस्ताव तयार केला आहे. यात प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांचाही समावेश आहे. यासंदर्भात नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. सात दिवसांच्या आत नागरिकांनी आपल्या सूचना किंवा हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)