शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नवीन पनवेल, कामोठेमध्ये सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:32 IST

महापालिकेची चिंता वाढली : इमारतीमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे बळी जाणाऱ्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पालिका क्षेत्रात नवीन पनवेल, कामोठे, पनवेलमध्ये सर्वाधिक कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. सोमवारपर्यंत येथे कोरोनामुळे ३७१ जणांचा बळी गेला आहे.पनवेल महापलिका क्षेत्रात विशेषत: इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिका प्रशासनास कोरोना संसर्गाला रोखण्यात यश आले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली या परिसरात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. नवीन पनवेल, कामोठे, पनवेल या परिसरात कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत.सोमवारपर्यंत पनवेल पालिका क्षेत्रात १६,६९२ जणांना कोरोनाची लागन झाली आहे, तर ३७१ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. यात सर्वाधिक नवीन पनवेल येथे ९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर, कामोठे परिसरात ८५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. पनवेल शहरात ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडण्यात कोरोनाबाधितांना सुविधा, तसेच आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता, कोरोनाबाबत अज्ञानता, बेड शोधण्यात जाणारा वेळ, वेळेवर न मिळणारी अ‍ॅम्बुलन्स या सर्व बाबी कारणीभूत आहेत. दिवसेंदिवस वाढते रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाºया संखेत वाढ होत असल्यामुळे महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस