शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मेटल, आॅक्साइडच्या दागिन्यांना पसंती

By admin | Updated: October 13, 2015 01:38 IST

नवरात्रोत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे दांडिया. नऊ दिवसांच्या दांडियामध्ये नटण्याथटण्यासाठी तरुणींची जिव्हाळाची गोष्ट म्हणजे आकर्षक दागिने.

प्राची सोनवणे, नवी मुंबईनवरात्रोत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे दांडिया. नऊ दिवसांच्या दांडियामध्ये नटण्याथटण्यासाठी तरुणींची जिव्हाळाची गोष्ट म्हणजे आकर्षक दागिने. पोशाख कितीही सुंदर असला तरी दागिन्यांशिवाय त्याचे सौंदर्य नजरेत भरत नाही. त्यामुळे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत विविध प्रकारचे दागिने बाजारात दाखल झाले आहेत. गरब्यासाठी वेगवेगळ्या मेटलच्या, आॅक्साइड, तांब्या-पितळाच्या दागिन्यांचे आणि काळ्या धाग्यापासून बनविलेले आकर्षक नेकलेस ६० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. हातातले राजस्थानी कडे घागऱ्यावर बांधण्यासाठी कमरपट्टा आदी आभूषणे पारंपरिकतेत आणखी भर टाकतात. डायमंड, मेटल यापासून बनविलेले आकर्षक कमरपट्टे ५० रुायांपासून २,००० रुपयांपर्यंत मिळतात. नवरात्रीचा स्पेशल लूक आणण्यासाठी बाजारात खास आॅक्झिडाइज ज्वेलरी दाखल झाली असून यात बांगड्या, बिंदी, नेकपिस, इअररिंग, कलरफुल गोंडा यांसारखे अनेक दागिने बाजारात उपलब्ध आहेत.सिल्क थ्रेडचा वापर करून बनवलेल्या बांगड्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नऊ रंगांच्या नऊ बांगड्यांचा सेट तसेच एथेनिक नेलपेंट प्रिंटदेखील बाजारात आल्या आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये केसाच्या भांगामध्ये बिंदी घालण्याची पद्धत आहे. दांडियाच्या दागिन्यांची सुरुवातही या बिंदीपासून होते. भांगामध्ये तीन साखळ्या व कपाळावर रुळणारे लोलक अशा साध्या दागिन्यांपासून भांगाच्या दोन्ही बाजूला असलेले घुंगरू, मोठे लोलक, त्यावर मनोवेधक नक्षी अशा विविध प्रकारांत बिंदी सजल्या आहेत. दागिन्यांचा करडा रंग हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. त्यामध्ये लाल, काळ्या रंगांचे मणी आहेत. काहींची शोभा आरसे वाढवत आहेत; पण खरे सौंदर्य हे करड्या रंगाचेच. गळ्यातल्या दागिन्यांमध्ये लांबसडक हारांपासून गळ्याला चिटकून बसणाऱ्या हारांपर्यंत अनेक प्रकार आहेत. मोठमोठी पदके, त्याला असलेले चौकोनी, त्रिकोणी आकार, घुंगरूंनी केलेली सजावट यामुळे हे दागिने दुरूनही उठून दिसतात. पण दंडात बांगड्या घालण्याची पद्धत हीदेखील घागरा चोलीमधील फॅशनेबल लूक देतात. यासाठी दंडातील बांगड्या पांढऱ्या रंगात मिळतात. कवड्याचे दागिने हे नवरात्रीतील दागिन्यांमधील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. कवड्याचा कंबरपट्टा, बाजूबंद, बिंदी हा खास प्रकार दांडियामध्ये शोभून दिसतो.