शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत ठाकूर यांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:32 IST

९२ हजारांचे मताधिक्य; १ लाख ७८ हजार ५८१ मतांनी विजयी

पनवेल : राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूर विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. शेकापचे हरेश केणी यांचा त्यांनी पराभव केला. या लढतीत प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. पराभूत उमेदवार हरेश केणी यांना ८६,२११ मते मिळाली आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघात यंदा मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाल्याने शेकापच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचे तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, मतदानाच्या कमी टक्केवारीचा परिणाम भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना फारसा झालेला दिसून आला नाही.

२५ फेऱ्यांमध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतगणना करण्यात आली. या वेळी पहिल्या फेरीपासूनच ठाकूर आघाडीवर होते. अंतिम २५ फेरीच्या मतमोजणीपर्यंत प्रशांत ठाकूर यांना सुमारे ९२ हजार ३७० एवढे मताधिक्य मिळाले.पनवेल विधानसभा मतदारसंघातील नोटा व मतदानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. दहा उमेदवारांपैकी नोटाला तिसºया क्रमांकाची १२,३७१ मते मिळाली. सकाळी ८ वाजता व्ही. के. शाळेत मतमोजणीला सुरुवात झाली. तत्पूर्वी शेकाप, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसराला गराडा घातला होता.

मतमोजणीच्या फेºया जशा जशा पुढे जात होत्या, तसे भाजपचे मताधिक्य वाढत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. पाणी, रस्ते आदी प्रश्नांवर निवडणूक लढवत असलेल्या शेकापला शहरी मतदारांनी स्पष्टपणे नाकारले असले तरी नवखा उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाºया हरेश केणी यांनी सुमारे ८६,२११ मते मिळविली.

शेतकरी कामगार पक्षाकडून अचानक हरेश केणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने त्यांना प्रचारासाठी महिनाभराचाही कालावधी मिळाला नाही. प्रशांत ठाकूर यांची कार्यपद्धत, दांडगा जनसंपर्क, तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या आमदारपदी विराजमान झाले.

विजयानंतर भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल शहरात विजयी रॅली काढण्यात आली. या वेळी शहरात फटाक्याची आतशबाजी तसेच ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. महायुतीला दिलेला कौल लक्षात घेता, मी पनवेलकरांचे आभार व्यक्त करतो. मतदारांनी पनवेलच्या सर्वांगीण विकासाला मतदान केले आहे. त्यांचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड सुरू आहे. त्या घौडदोडीला पनवेलकरांनीही साथ दिली आहे. महायुतीला दिलेला कौल लक्षात घेता, मी पनवेलकरांचे आभार व्यक्त करतो. मतदारांनी पनवेलच्या सर्वांगीण विकासाला मतदान केले आहे. त्यांचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड सुरू आहे. त्या घौडदोडीला पनवेलकरांनीही साथ दिली आहे.- प्रशांत ठाकूर, विजयी उमेदवार, भाजप, पनवेल

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019panvel-acपनवेलBJPभाजपा