ऐरोलीमधील महानगरपालिकेच्या नाट्यगृहाला आग, कर्मचारी छतावर अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:26 IST2026-04-17T17:24:55+5:302026-04-17T17:26:08+5:30
महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ऐरोलीमधील महानगरपालिकेच्या नाट्यगृहाला आग, कर्मचारी छतावर अडकले
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ऐरोली सेक्टर ५ मधील काम सुरू असलेल्या नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. आग लागल्यामुळे काही कर्मचारी छतावर अडकले होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सेक्टर ८६० आसनक्षमतेच्या नाट्यगृहाचे काम अंतीम टप्यात आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक नाट्यगृहाला आग लागली आहे. नाट्यगृहाच्या वरील मजल्यावर ही आग लागली आहे. काही कामगार इमारतीच्या छतावर अडकले असून त्यांची सुटका करण्याचे व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. ऐरोली, कोपरखैरणे व वाशी अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.
महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.