पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:45 IST2026-04-19T14:43:48+5:302026-04-19T14:45:42+5:30
पश्चिम बंगालमधील निवडणूक वातावरण सध्या जबरदस्त तापले आहे. यातच एका व्हिडिओने सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ...

पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
पश्चिम बंगालमधील निवडणूक वातावरण सध्या जबरदस्त तापले आहे. यातच एका व्हिडिओने सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लीम वृद्ध व्यक्ती 'भारत माता की जय' आणि 'जय श्रीराम'च्या घोषणा देताना दिसत आहे. त्याच्या पाठीमागे भाजपचा झेंडाही दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भाजप समर्थकांकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ 'एआय' (AI) निर्मित असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. तर काही लोक याला 'अल-तकिया' असे म्हणत आहेत.
'अल-तकिया' म्हणजे काय? -
'अल-तकिया' (Taqiyya) हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ सावधगिरी अथवा सुरक्षा असा होतो. इस्लाममध्ये, जेव्हा मुस्लिमांना त्यांच्या जीवाला, मालमत्तेला किंवा धर्माला गंभीर धोका जाणवतो, तेव्हा ते त्यांच्या खऱ्या श्रद्धा लपवतात अथवा तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा त्याग करतात. ही एक स्वसंरक्षणाची रणनीती आहे. जिला 'अल-तकिया' म्हटले जाते.
पश्चिम बंगाल में BJP आ रही है 🔥🔥
— Chandan Sharma (@ChandanSharmaG) April 18, 2026
अब तो बंगाली मौलवी और मौलाना भी सरेआम आम में माइक लेकर भारत माता की जय और जय श्री राम के नारे लगा रहे हैं।
यह वीडियो TMC और ममका बनर्जी तक पहूंचा दीजिए pic.twitter.com/idhHdy7XS2
दुसरीकडे, राजकीय मंचावरूनही या घोषणेवरून चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बंगालमधील रॅलीत म्हणाले, येथे 'जय श्रीराम' म्हणणाऱ्यांवर अत्याचार केले जातात. आज आपण बंगालमध्ये जय श्रीराम घोषणा देऊ शकत नाही. जर दिली तर सरकार त्रास देते अथवा टीएमसीचे गुंडं हल्ला करतात. दुर्गा पूजेपूर्वीच काही ना काही गोंधळ होतो. येथील सरकार दुर्गा पूजा अथवा विसर्जनावेळी परवानगी देत नाही.
गृहमंत्री अमित शाह यांचाही २०२१ चा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात त्यांनी 'जय श्रीराम' हा बंगालमधील तुष्टीकरणाच्या राजकारणाविरुद्धचा नारा असल्याचे म्हटले होते. सध्या निवडणुकीच्या प्रचारात मांसाहारावरूनही वाद सुरू असून, टीएमसीने भाजपवर खाद्यसंस्कृतीवर गदा आणेल, असा आरोप केला आहे. तर भाजपने गोमांस बंद करण्याचे आश्वासन दिले आहे.