क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:49 IST2026-04-19T15:43:52+5:302026-04-19T15:49:43+5:30

Death Caught on camera: सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी हल्ली काहीही केलं जात आहे. अनेकजण जीवही गमावून बसले आहेत, पण तरीही अशा गोष्टी थांबलेल्या नाहीत. अशीच घटना समोर आलीये. 

The game is over in an instant! Three people on the same motorcycle, revolvers in their hands; They lost their lives for the reel | क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले

क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले

Viral Video: स्टंटबाजी करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. पण, हा व्हिडीओ बघून तुमचाही थरकाप उडेल. एकाच मोटारसायकलवर तीन तरुण बसून रीलसाठी स्टंटबाजी करत होते. त्यातील एका तरुणाकडे रिव्हॉल्व्हर आहे. रिव्हॉल्व्हर दाखवत व्हिडीओ बनवला जात असतानाच ही घटना घडली, ज्यात तिघांचाही मृत्यू झाला. 

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यामध्ये असलेल्या मऊगंज येथे ही घटना घडली आहे. मऊगंजमध्ये राष्ट्रीय महामार्ग १३५ वर हे तरुण स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ बनवत होते. महामार्गावर जड वाहने जात असतानाच त्यांना कट मारत वेगात मोटारसायकल चालवना ही घटना घडली. 

स्टंटबाजी, रील आणि मृत्यू; व्हिडीओ बघा

दोन मोटारसायकलवर हे तरुण होते. एका मोटारसायकलवरील तरुण दुसऱ्या मोटारसायकलवरील तरुणांचा व्हिडीओ बनवत होते. व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांनी मोटारसायकलचा वेग वाढवला.

त्यानंतर स्टंट करणारे तरुण वेग वाढवत वाहनांना कट मारत पुढे गेले. पण, बाईकचा वेग इतका होता की, बाजूला असलेले आणि समोर असलेल्या दोन्ही कंटनेरमधून पुढे जातानाच हा अपघातच झाला. तिघेही या अपघातात मरण पावले. 

Web Title : रील स्टंटिंग पड़ी भारी: मोटरसाइकिल दुर्घटना में तीन की मौत

Web Summary : मध्य प्रदेश में सोशल मीडिया वीडियो के लिए मोटरसाइकिल स्टंट करते समय तीन युवकों की मौत हो गई। तीन लोगों और एक रिवॉल्वर को ले जा रही तेज रफ्तार बाइक ओवरटेक करते समय दुर्घटनाग्रस्त हो गई, जिसके परिणामस्वरूप तीनों की तत्काल मौत हो गई।

Web Title : Reel stunt goes wrong: Three die in motorcycle accident

Web Summary : Three young men died in Madhya Pradesh while performing motorcycle stunts for a social media video. The speeding bike, carrying three people and a revolver, crashed while overtaking, resulting in the immediate death of all three.