Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:41 IST2026-04-19T14:40:35+5:302026-04-19T14:41:12+5:30
तरूणावर कारवाई केली जावी अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे

Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
Kadhai Helmet viral video: सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकते. कधी एखादा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादा भावनिक व्हिडीओ चर्चेचे कारण बनतो. पण सध्या बंगळुरूतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये अनेकदा रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती केली जाते. मात्र, बंगळुरूमध्ये व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दंडाच्या भीतीने एका तरुणाने हेल्मेटऐवजी डोक्यावर चक्क स्वयंपाकाची कढई ठेवून प्रवास केला.
कढई हेल्मेटची अनोखी फॅशन होतेय व्हायरल
ही घटना बंगळुरूच्या एचएसआर लेआउट ट्रॅफिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अग्रहारा जवळची आहे. एका बाईकवर दोन युवक प्रवास करत होते. चालक तरुणाने नियमानुसार हेल्मेट घातले होते, मात्र त्याच्या मागे बसलेल्या मित्राकडे हेल्मेट नव्हते. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि ट्रॅफिक पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी मागे बसलेल्या तरुणाने चक्क ॲल्युमिनियमची कढई डोक्यावर उपडी ठेवली आणि ती हाताने घट्ट पकडून ठेवली.
Kadhai Helmet in Trend pic.twitter.com/xUH8MoHwiL
— Viru B (@ViruB1023220) April 19, 2026
पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न
लांबून पाहिल्यास ती चमकदार रंगाच्या हेल्मेटसारखी वाटत होती. मात्र, जवळून पाहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ सुमारे ५ महिने जुना असला, तरी सध्या तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या घातक जुगाडवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरत आहे.