श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!

IPL 2026 Star Performers Indian Cricketers: टी२० वर्ल्डकप जिंकणारे बडे खेळाडू IPL मध्ये फ्लॉप ठरताना दिसत आहेत.

भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी२० विश्वचषक जिंकला. पण सध्या सुरु असलेल्या IPL स्पर्धेत वेगळेच चित्र दिसत आहे.

टी२० विश्वचषकाच्या वेळी ज्या खेळाडूंकडे भारतीय निवड समितीने दुर्लक्ष केले होते, तेच आता IPL 2026चे मैदान गाजवताना दिसत आहेत.

IPL 2026 मध्ये काही बडे खेळाडू फ्लॉप होताना दिसत आहेत, पण हे सात धुरंधर मात्र मैदानात उतरताच आपली सत्ता गाजवत आहेत.

श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. तसेच, ५ सामन्यात तब्बल २०३ धावाही कुटल्या आहेत.

प्रभसिमरन सिंग पंजाब किंग्जला दमदार सलामी मिळवून देतो. त्याने आतापर्यंतच्या ५ सामन्यात २११ धावा काढल्या आहेत.

रजत पाटीदारने बंगळुरू संघाचे कर्णधारपद अप्रतिम पद्धतीने सांभाळले असून त्याच्या ५ सामन्यात तब्बल २२२ धावा आहेत.

रवी बिश्नोईने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना फिरकीची जादू दाखवून दिली आहे. त्याने ५ सामन्यात ९ गडी बाद केले आहेत.

यशस्वी जैस्वालने राजस्थान रॉयल्सला नेहमीच दमदार सलामी दिली आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये तुफानी १८४ धावा केल्या आहेत.

भुवनेश्वर कुमारने बंगळुरू संघाकडून खेळताना अनुभवाची चुणूक दाखवून दिली आहे. त्याने ५ सामन्यात १० बळी टिपले आहेत.

देवदत्त पडिक्कलने बंगळुरूकडून खेळताना मधल्या फळीत धावगती वाढवली आहे. त्याने ४ सामन्यात १२५ धावा ठोकल्या आहेत.