“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:00 IST2026-04-19T15:59:00+5:302026-04-19T16:00:05+5:30

होर्मुझ सामुद्रधुनीत इराणी गनबोट्सकडून गोळीबार; भारतीय टँकर परत फिरले. ‘परवानगी दिली तरी फायरिंग का?’ असा सवाल करणारा ऑडिओ समोर

"Permission given, but why fire?" Shocking audio of Indian tanker; Tensions rise in Strait of Hormuz | “परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला

“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला

होर्मुझ सामुद्रधुनीत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांशी संबंधित एक गंभीर घटना समोर आली आहे. इराणी गनबोट्सकडून गोळीबार झाल्याने दोन भारतीय तेलवाहू टँकरांना मधूनच परत फिरावे लागले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी समोर आलेल्या ऑडिओमुळे परिस्थितीची तीव्रता स्पष्ट झाली आहे. या प्रकरणावर भारताने इराणकडे तीव्र नाराजी व्यक्त करत जहाजांच्या सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मांडला आहे.

काय घडले नेमके?

शनिवारी होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करत असताना दोन भारतीय ध्वज असलेल्या तेल टँकरांना अचानक अडवण्यात आले. इराणी गनबोट्सकडून गोळीबार झाल्याने या जहाजांना पुढे जाण्याऐवजी परत वळावे लागले. सुदैवाने या घटनेत कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.

ऑडिओमुळे उघड झाली भीतीदायक परिस्थिती

या घटनेदरम्यान कच्चे तेल वाहतूक करणाऱ्या ‘सनमार हेराल्ड’ या टँकरवरून पाठवलेला एक ऑडिओ समोर आला आहे. सुमारे ३० सेकंदांच्या या संदेशात जहाजावरील क्रू मेंबर ईरानी नौदलाशी संवाद साधताना म्हणतो की, “आपण आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिली होती. आमचे नाव तुमच्या यादीत आहे. तरीही गोळीबार का? कृपया आम्हाला परत जाण्याची परवानगी द्या.” हा ऑडिओ ऐकताना त्या क्षणी जहाजावरील तणाव आणि गोंधळ स्पष्ट जाणवतो.

ऑडिओ कसा समोर आला?

समुद्री हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘टँकर ट्रॅकर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा ऑडिओ शेअर केला. संबंधित अहवालानुसार, जहाज सुरक्षित झोनमध्ये होते. सुरुवातीला जहाजाने आपली ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम बंद केली होती, मात्र नंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. दुसऱ्या टँकरचे नाव ‘जग अर्णव’ असल्याची माहिती आहे.

भारताची कडक प्रतिक्रिया

या घटनेनंतर भारत सरकारने तातडीने भूमिका घेत इराणच्या राजदूताला पाचारण केले. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की भारतीय जहाजे आणि खलाशांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य आहे. भारताने इराणला पूर्वी दिलेल्या सहकार्याची आठवण करून देत आता सुरक्षित मार्गाची हमी देण्याची मागणी केली आहे. यावर इराणच्या बाजूने भारताच्या चिंता संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले.

समुद्री व्यापारासाठी वाढते धोके

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. अशा घटनांमुळे जागतिक तेल पुरवठा आणि व्यापारावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतीय जहाजांवर झालेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title : अनुमति के बावजूद भारतीय टैंकरों पर गोलीबारी; होर्मुज जलडमरूमध्य में तनाव बढ़ा

Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य में ईरानी गनबोटों ने अनुमति के बावजूद भारतीय तेल टैंकरों पर गोलीबारी की। एक ऑडियो रिकॉर्डिंग से चालक दल का संकट पता चलता है। भारत ने ईरान से कड़ा विरोध जताया और अपने जहाजों और चालक दल के लिए सुरक्षा गारंटी की मांग की।

Web Title : Indian Tankers Fired Upon Despite Clearance; Hormuz Strait Tension Rises

Web Summary : Iranian gunboats fired on Indian oil tankers in the Hormuz Strait, despite prior clearance. An audio recording reveals the crew's distress. India has strongly protested to Iran, demanding safety guarantees for its ships and crew in the vital shipping lane.