शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची आर्थिक उलाढाल

By admin | Updated: November 9, 2015 02:47 IST

ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतानाच दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांचा बार उडविण्याची मानसिकता अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही

आविष्कार देसाई, अलिबागध्वनिप्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतानाच दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांचा बार उडविण्याची मानसिकता अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यात या वर्षी सुमारे १४५ फटाके विक्रीचे स्टॉल उभे राहिले आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. मात्र यामुळे प्रदूषणाची समस्याही तितकीच वाढत असल्याचे पर्यावरणप्रेमी यांचे म्हणणे आहे.दिवाळी तेजोमय प्रकाशाचा आणि आनंद द्विगुणित करणारा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. खमंग फराळाच्या जोडीला फटाक्यांची आतषबाजी ही तितकीत महत्त्वाची मानण्याची परंपरा आजही तग धरुन आहे. दिवाळीमध्ये फटाके उडविण्याचे फॅड अद्यापही कायम आहे. त्यामुळेच या वर्षी महसूल प्रशासनाकडे आलेल्या प्रस्तावातून १४५ फटाके विक्री करणाऱ्या स्टॉलना परवानगी देण्यात आली आहे. फटाके विक्री करण्यामध्ये काही नवतरुणांचा एखादा ग्रुप आपापल्या खिशातून रक्कम गोळा करतो. त्याच्या माध्यमातून होलसेल मार्केटमधून फटाके विकत घेऊन त्याची किरकोळ विक्री तो करतो. सुट्टीच्या दिवसांमध्ये चार पैसे जवळ आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसते. प्रत्येक तालुक्यात असे स्टॉल मोठ्या संख्येने टाकल्याचे आपल्याला दिसून येते. फटाके उडवू नयेत याबाबत विविध संघटना, संस्था समाजामध्ये जनजागृती करीत आहेत. फटाके वाजवूनच दिवाळी साजरी केली पाहिजे हे काही जरुरीचे नाही. फटाक्यांमुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. याची जाणीव सरकारला असून देखील विविध कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात फटाक्यांचे उत्पादन होते. त्यावर बंधने आणली पाहिजेत. पर्यावरणपूरक म्हणजे कमी आवाजाचे, कमी प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती झाली पाहिजे.-डॉ. अनिल पाटील, पर्यावरण तज्ज्ञ