शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील मॅन्ग्रोव्हजचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: November 10, 2015 00:16 IST

रायगड जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्याच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या मॅनग्रोव्हज्चे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल १३६३ हेक्टरवर मॅनग्रोव्हज्

नामदेव मोरे,नवी मुंबईरायगड जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्याच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या मॅनग्रोव्हज्चे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल १३६३ हेक्टरवर मॅनग्रोव्हज् असले तरी अद्याप अधिकृत वन घोषीत केलेले नाही. पनवेल, उरण सह पूर्ण जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली ही वनस्पतीच नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेळेतच वृक्षतोड थांबविली नाही तर सुनामी व मोठ्या वादळामध्ये समुद्राचे पाणी शहरांमध्ये जाऊन प्रचंड जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुर्ण कोकणामधील मॅनग्रोव्हज्च्या रक्षणासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. सामाजीक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईमध्ये १७७५ हेक्टर मॅनग्रोव्हज्चे जंगल घोषीत केले आहे. प्रत्येक ठिकाणी वनविभागाने बोर्ड लावून शहराची कवचकुंडले असणाऱ्या व खाडीकिनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या या वृक्षांची कत्तल केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे नंबरही देण्यात आले आहेत. याशिवाय न्यायालयाच्या निर्णयानंतर सिडकोेने वितरीत केलेल्या भुखंडावरील विकासकामेही थांबविण्यात आली आहेत. दक्ष नागरिकांमुळे मॅनग्रोव्हज्चे रक्षण होण्यास सुरवात झाली आहे. परंतू रायगड जिल्ह्यात जवळपास १३६३ हेक्टर जमीनीवर मॅनग्रोव्हज् आहे. पनवेल, उरण, पेण, अलीबाग, श्रिवर्धन, रोह्याचा काही भाग व इतर ठिकाणी खाडीकिनारा असून मॅनग्रोव्हज्ची जंगल आहे. परंतू शासनाने अद्याप हा परिसराला अधिकृतपणे जंगल म्हणून घोषीत केलेले नाही. नवी मुंबईपासून पेण पर्यंत खाडीकिनाऱ्यांजवळ इमारतींचे बांधकाम सुरू आहे. इतर विकास कामेही केली जात आहेत. या विकासासाठी मॅनग्रोव्हज्ची खुलेआम कत्तल सुरू आहे. दिवसेंदिवस मॅनग्रोव्हज्चे जंगल नाहीसे होत आहे. पर्यावरणामुळे खाडी किनाऱ्याचे रक्षण होते. किनाऱ्याची धुप कमी होते. याशिवाय भरती व वादळाच्या दरम्यान समुद्राचे पाणी शहरांमध्ये किंवा खाडीकिनाऱ्याच्या शेतीमध्ये जाण्यापासून बचाव होत असतो. रायगड जिल्ह्यामध्येही शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. उरण व पनवेल तालुका नवी मुंबई व मुंबईचा अविभाज्य भाग झाला आहे. याशिवाय नेरळ ते पेण पर्यंत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. सिडकोने नयना क्षेत्रातील २७० गावांमधील जमीनीचा विकास करण्याचे काम सुरू आहे. विकासाबरोबर प्रदुषणामध्येही वाढ होत आहे.