शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद पाठवतोय फेसबुक रिक्वेस्ट

By admin | Updated: January 23, 2015 02:41 IST

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नेमक्या ठावठिकाण्याची माहिती सरकारच्या हाती नसली तरी सध्या दाऊद इब्राहिम कासकर या नावाने सोशल मीडियात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

मनोज गडनीस - मुंबई
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नेमक्या ठावठिकाण्याची माहिती सरकारच्या हाती नसली तरी सध्या दाऊद इब्राहिम कासकर या नावाने सोशल मीडियात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दाऊदच्या नावे थेट फेसबुकच्या ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ येण्यास सुरुवात झाल्याने फेसबुकवर खळबळ उडाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीलाही या खात्यावरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली असून, यानंतर ‘लोकमत’ने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
बॉलीवूड, राजकीय नेते यांच्या नावाची बनावट खाती ही नवी नसली तरी गुन्हेगारी क्षेत्रातील आणि त्यातही दाऊदसारख्या कुख्यात डॉनच्या नावे आता खाती सुरू झाल्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार असून, अशा खात्याचा वापर ब्लॅकमेल करणे, समाजात तेढ निर्माण करणे याकरिता होऊ शकतो, असे मत तपास यंत्रणेतील सूत्रांनी व्यक्त केले. हे खाते बनावट असल्याचा कयास वर्तविला जात असला तरी, १०० टक्के तसा तर्क लावून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही मत सूत्रांनी व्यक्त केले.
विख्यात संगणकतज्ज्ञ विजय मुखी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, हे अकाउंट खरे आहे अथवा नाही हे सांगणे जरी कठीण असले तरी याच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून हे अकाउंट कुठून वापरले जात आहे, याची माहिती मिळू शकते. मात्र, अधिक माहिती हवी असेल तर फेसबुकशी थेट संपर्क साधावा लागेल. पण, एखाद्या खात्याची माहिती अथवा अनुषंगिक माहिती हवी असेल तर भारतच काय पण जगातील कोणत्याही तपास यंत्रणांना फेसबुक सहकार्य करीत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या अकाउंटबद्दल अधिक माहिती कंपनीकडून मिळणे अशक्य असल्याचे मुखी म्हणाले.

दाऊदच्या नावे असलेले हे खाते चतुराईने करण्यात आले आहे. फेसबुक प्रायव्हसी सेटिंगमधील बहुतांश फिचरचा वापर करून जोवर ही रिक्वेस्ट स्वीकारली जात नाही, तोवर त्याच्या अकाउंटवरील माहिती रिक्वेस्ट स्वीकारणाऱ्या व्यक्तीस दिसत नाही.

पोलीस लावणार छडा
‘लोकमत’ने हा प्रकार मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपायुक्त धनयंज कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, याची आम्ही दखल घेत असून, सायबर क्राईम शाखेच्या माध्यमातून याच्या तळापर्यंत जाऊन आम्ही याचा छडा लावू.