शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील बिल्डर्स लॉबीला चाप

By admin | Updated: August 31, 2015 03:25 IST

सिडकोतील अधिकारी आणि बिल्डर्सचे साटेलोटे सर्वश्रूत आहे. विभागा-विभागात पोसलेल्या या बिल्डर्स संस्कृतीमुळे सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना मात्र दुय्यम वागणूक मिळत आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईसिडकोतील अधिकारी आणि बिल्डर्सचे साटेलोटे सर्वश्रूत आहे. विभागा-विभागात पोसलेल्या या बिल्डर्स संस्कृतीमुळे सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना मात्र दुय्यम वागणूक मिळत आहे. परंतु मागील दोन वर्षात हे चित्र काहीसे बदलले आहे. सर्वसामान्य प्रकल्पग्रस्त आता सिडकोत हक्काने वावरताना दिसत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना मानाची वागणूक मिळू लागल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे पाहावयास मिळते.भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे सिडको चांगलीच बदनाम झाली आहे. मागील दहा-पंधरा वर्षांत शहरातील भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शंभर चौरस मीटरच्या भूखंडानेही कोटीची उड्डाने घेतली आहेत. त्यामुळे शहरातील संपूर्ण जमिनीची मालक असणाऱ्या सिडकोचे महत्त्व वाढले. विशेषत: सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना केंद्रस्थानी आली. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भूखंडांचे श्रीखंड लाटण्यासाठी सिडकोत बिल्डर्स लॉबी सक्रिय झाली. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या बिल्डर्स मंडळीसाठी चक्क पायघड्या अंथरल्या. बिल्डर्स व अधिकारी हातात हात घालून वावरू लागले. त्यामुळे साडेबारा टक्केची योजना नक्की प्रकल्पग्रस्तांसाठी आहे, की बिल्डरांसाठी असा प्रश्न उपस्थित होवू लागला. विशेष म्हणजे काही अधिकारीच बिल्डर बनून सिडकोत वावरू लागले. त्यामुळे या योजनेचे खरे लाभधारक असणारे प्रकल्पग्रस्त मात्र दुर्लक्षित राहिले. त्यांना सिडको दरबारी दुय्यम वागणूक मिळू लागली. आपल्या फाईलची स्थिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना हे अधिकारी स्वत:ची भागीदारी असणाऱ्या बिल्डर्सकडे पाठवू लागले. एकूणच अधिकारी आणि बिल्डर्स यांच्यात निर्माण झालेल्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे सिडकोचा साडेबारा टक्केचा विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला. प्रत्येक टेबलावर अर्थशास्त्राचे पाढे सुरू झाल्याने प्रकल्पग्रस्तांची कोंडी झाली. त्यामुळे अनेकांनी केवळ नाईलाज म्हणून आपल्या भूखंडांचे आवॉर्ड बिल्डर्संना विकून टाकले. सिडकोत फोफावलेल्या या भ्रष्टाचारामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपले कोट्यवधींचे भूखंड कवडीच्या दामाने बिल्डरांच्या घशात घातले. बिल्डरांनी त्या भूखंडांवर मोठमोठे टॉवर उभारून गडगंज पैसा कमाविला, परंतु त्याचे मूळ लाभधारक असणारे प्रकल्पग्रस्त मात्र दारिद्र्यातच राहिले. एकूणच नवी मुंबईच्या उभारणीसाठी आपल्या शेतजमिनी देणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना आणण्यात आली. मात्र सिडकोत रुजलेल्या बिल्डर्स संस्कृतीने शासनाच्या या योजनेला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संजय भाटिया यांनी सर्वप्रथम सिडकोतील भ्रष्टाचाराचे पाळेमुळे खणून काढण्याच्या दृष्टीने प्रयास सुरू केले. त्यासाठी त्यांनी शिस्तप्रिय व प्रामाणिक म्हणून प्रशासकीय सेवेत ओळखल्या जाणाऱ्या व्ही. राधा यांना सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी आणले. व्ही. राधा यांनी सर्वप्रथम भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या साडेबारा टक्के भूखंड वाटप विभागावर आपले लक्ष केंद्रित केले. हा संपूर्ण विभाग स्वत:च्या नियंत्रणाखाली आणला. यापूर्वी वाटप झालेल्या व प्रलंबित असलेल्या संचिकांचे सखोल अवलोकन केले. त्यासाठी या विभागाची माहिती असणाऱ्यांची एक उपसमिती नेमली.