शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोलकातामधील कॉलसेंटरचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 03:09 IST

जुईनगर येथील बनावट कॉलसेंटरवर केलेल्या कारवाईत कोलकातामध्येही कॉलसेंटर चालत असल्याचे समोर आले होते.

नवी मुंबई : जुईनगर येथील बनावट कॉलसेंटरवर केलेल्या कारवाईत कोलकातामध्येही कॉलसेंटर चालत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी ही बाब कोलकाता पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊन कारवाई केली. दरम्यान, जुईनगर येथील कॉलसेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची सुमारे सात हजार डॉलरची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.अमेरिकेतील नागरिकांना कॉलिंगद्वारे धमकावून पैसे उकळणारे कॉलसेंटर जुईनगर येथे चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गतमहिन्यात गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक नीलेश तांबे, राजेश गज्जल, राणी काळे, सहायक उपनिरीक्षक संजय पवार आदीच्या पथकाने छापा टाकला होता. या वेळी कॉन्सीअर्ज हेल्प केअर सोल्युशन नावाने हे कॉलसेंटर चालवणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी प्रमुख सूत्रधार मोहम्मद साजीद मोहम्मद जुनेद शेख (२९) याच्यासह त्याचा एक साथीदार व इतर एक जण पूर्वी कोलकाता येथील कॉलसेंटरमध्ये काम करत होते. पथकाने कॉलसेंटरचा शोध घेत स्थानिक पोलिसांमार्फत कारवाई केली.जुईनगरमधील कारवाईत अमेरिकन नागरिकांना धमकावून सुमारे सात हजार डॉलर एका खात्यात ट्रान्सफर करून घेतले असल्याचे उघड झाल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. आरोपींनी ज्या कंपनीच्या नावे कॉलसेंटर सुरू केले होते, त्याच नावाची अमेरिकेतही कंपनी आहे. यामुळे इंटरनेट गेटवे वापरून डेटा चोरला होता. त्याआधारे संगणक दुरुस्तीच्या बहाण्याने नागरिकांना धमकावले जात होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई