शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधून २७,६६,००० करवसुली

By admin | Updated: November 18, 2016 03:50 IST

खारघर ग्रामपंचायत हद्दीतील गावातून पनवेल पालिकेने प्रथमच २७ लाख ६६ हजार रुपयांची करवसुली केली आहे.

पनवेल : खारघर ग्रामपंचायत हद्दीतील गावातून पनवेल पालिकेने प्रथमच २७ लाख ६६ हजार रुपयांची करवसुली केली आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे शासनाने सरकारी देणी चुकवण्यासाठी जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याचे घोषित केले आहे. ग्रामस्थांनी थकीत कराचा भरणा केल्याने पनवेल महापालिकेच्या खारघर कार्यालयात २७ लाख ६६ हजारांची करवसुली झाली आहे. पनवेल शहर महापालिकेचे कामकाज १ आॅक्टोबरपासून सुरू झाले आहे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघर, ओवे, तळोजा परिसराची जबाबदारी अधीक्षक श्रीराम हजारे यांच्याकडे सोपविली आहे. हजारे यांनी खारघर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन २० आॅक्टोबरपासून पंचायत हद्दीतील खारघर, कोपरा, बेलपाडा आणि आदिवासी पाड्यात मालमत्ता, घरपट्टी भरण्याची नोटीस देण्यास सुरुवात केली. खारघर ग्रामपंचायत ही पनवेल तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. ग्रामस्थांना घरपट्टीची नोटीस पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असे. पालिकेने नोटीस पाठविल्यानंतर ठरावीक ग्रामस्थांनीच घरपट्टीचा भरणा केला होता. दरम्यान, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे सरकारी करवसुलीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे घोषित केल्याने दहा दिवसांत २७ लाख ६६ हजार करवसुली झाल्याची माहिती खारघर कार्यालयाकडून मिळाली. (प्रतिनिधी)