शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत सात वर्षांत 25 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण; श्वान नियंत्रण अभियान यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 00:03 IST

२२ हजार भटक्या कुत्र्यांवर उपचार

नामदेव मोरे

नवी मुंबई :  भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेने श्वान नियंत्रण उपक्रम सुरू केला आहे. सात वर्षांत तब्बल ४९२२४ कुत्री पकडली असून त्यामधील २५१३१ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. २२३९७ कुत्र्यांवर उपचार करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास ९० टक्के भटक्या कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यात यश आले असून श्वान नियंत्रणाचा नवी मुंबई पॅटर्न राज्यभर राबविण्याची मागणी होत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक महानगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. रात्री अनेक रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत पाहावयास मिळते. कुत्रे मागे लागल्यामुळे मोटरसायकलचे अपघात होण्याच्या घटनाही होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने २००६ पासून श्वान नियंत्रण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. इन डिफेन्स ऑफ ॲनिमल संस्थेला हे काम देण्यात आले होते. कोपरीमधील केंद्र मोडकळीस आल्यामुळे सद्यस्थितीमध्ये तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर तात्पुरत्या स्वरूपात श्वान नियंत्रण केंद्र उभारून तेथे हे काम सुरू केले आहे. २०१४ पासून श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात आली आहे. तुर्भेमधील केंद्रामध्ये सुरुवातीला ३०० ते ५०० श्वानांवर शस्त्रक्रिया केली जात होती. शस्त्रक्रिया केलेल्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ९० टक्के श्वानांवर शस्त्रक्रिया झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे श्वान नियंत्रणाचे अभियान यशस्वी झाले आहे. शस्त्रक्रियेसाठी आता श्वान पुरेशा प्रमाणात सापडत नाहीत. सद्यस्थितीमध्ये महिन्याला १२५च्या दरम्यान शस्त्रक्रिया होत आहेत. महानगरपालिकेने समान कामास समान वेतन नियमाप्रमाणे श्वान नियंत्रण उपक्रमासाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे अधिक गतीने हे काम करणे शक्य होत आहे. नवी मुंबईप्रमाणे हे अभियान इतर ठिकाणीही राबविणे आवश्यक असून प्राणीप्रेमी संघटनांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

नवी मुंबईत हवे स्वतंत्र केंद्र
महानगरपालिकेच्या श्वान नियंत्रण केंद्रासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. सद्यस्थितीमध्ये डम्पिंग ग्राऊंडवर तात्पुरत्या स्वरूपात केंद्र उभारले आहे. शेजारीच डम्पिंग ग्राऊंड असल्यामुळे केंद्रातील कर्मचारी व श्वान सर्वांनाच धुळीचा त्रास होत आहे.  दुर्गंधीमुळेही आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज, पाणी व इतर समस्याही भेडसावू लागल्या आहेत. महानगरपालिकेने श्वान नियंत्रण केंद्रासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करावी व नवीन केंद्र उभारण्याची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका